शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर अपघात; टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 6:37 PM

गॅस टँकर उलटल्याने खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ अडवून ठेवल्याने महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती

नितिन पंडीत

भिवंडी - दुचाकी स्वारास भरधाव एलपीजी गॅस टँकरची जोरदार धडक लागल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून गॅस टँकर देखील उलटला असल्याची घटना मुंबई नाशिक महामार्गावर सोनाळे गावच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी घडली आहे. उलटलेल्या एलपीजी गॅस टँकरमधून गॅस गळती होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खबरदारीचा उपाय म्हणून या महामार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाकडून थांबविण्यात आली आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. 

एलपीजी गॅस टँकर मुंबईहुन नाशिकच्या दिशेने जात असतांना सोनाळे गावच्या हद्दीत या टँकरने एका दुचाकीस्वाराला जोरदार ठोकर मारली व टँकरचालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने एलपीजी भरलेला गॅस टँकर पुढे जाऊन उलटला . या टँकरमधून गॅस गळती सुरु झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान टँकरचालक फरार झाला असून या अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

तर गॅस टँकर उलटल्याने खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ अडवून ठेवल्याने महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर हलक्या वाहनांना पर्यायी रस्ता म्हणून मुंबई नाशिक महामार्गाच्या बाजूला असलेल्या पाईपलाईनच्या रस्त्यावरून हलकी वाहने सोडण्यात येत आहे. 

टॅग्स :Accidentअपघात