शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

मोबाइल अ‍ॅप लावणार अपघातांना ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:49 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : रस्ते अपघातांवर शास्त्रीय उपाय शोधण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटेग्रेटेड रोड अ‍ॅक्सिडेंट डेटाबेस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : रस्ते अपघातांवर शास्त्रीय उपाय शोधण्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने इंटेग्रेटेड रोड अ‍ॅक्सिडेंट डेटाबेस (आयआरएडी) प्रकल्प हाती घेतला आहे. ठाण्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून अपघातासंबंधी इत्यंभूत माहिती गोळा केली जाणार असून आयआयटी चेन्नईद्वारे त्याचे विश्लेषण होणार आहे. ठाण्यातील १०० पोलिसांना त्यासाठी विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे.

दिवसेंदिवस प्रशस्त रुंद रस्त्यांवरून जाणाऱ्या अत्याधुनिक वाहनांचा वेगही वाढला आहे. वाढत्या वेगामुळे तसेच बेदरकार चालकांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात २०१९ मध्ये ८७४ अपघातांमध्ये २१७ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले, तर ७९४ प्रवासी जखमी झाले. २०२० मध्ये ६६८ अपघातांध्ये ६१२ जण जखमी, तर १९२ जणांचा मृत्यू झाला. जानेवारी ते मे २०२१ या पाच महिन्यांत ३२८ अपघातांमध्ये ८४ जणांचा मृत्यू, तर २८४ जखमी झाले आहेत. आता असे अपघात रोखण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठीच आयआरएडी या अ‍ॅपची निर्मिती केली आहे.

..................................

* जिल्ह्यातील रस्ते अपघात...

वर्ष अपघात जखमी मृत्यू

२०१९ ८७४ ७९४ २१७

२०२० ६६८ ६१२ १९२

२०२१ (जूनपर्यंत) ३२८ २८४ ८४

..............

१०० पोलिसांना प्रशिक्षण

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अपघातांचे विश्लेषण करण्यासाठी केंद्र शासनाच्या महामार्ग मंत्रालयाने ३ ते १७ मे २०२१ या कालावधीत ३५ पोलीस ठाण्यांमधील १०० पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रशिक्षण दिले आहे.

* आतापर्यंत ९५ अपघातांची नोंद -

आयआरएडी या अ‍ॅपमध्ये २१ जानेवारी ते २१ मे २०२१ या कालावधीमध्ये ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडलांमधील ३५ पोलीस ठाण्यांमधून ९५ अपघातांची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अ‍ॅपद्वारे असे चालणार काम...

एखादा अपघात घडल्यानंतर त्याचे फोटो, घटनास्थळ, अपघातातील वाहनांची संख्या, स्थिती, अपघातामधील व्यक्तींची संख्या, मृत तसेच जखमींची संख्या, त्याचबरोबर यामध्ये वाहनाचे झालेले नुकसान, वातावरणाची स्थिती (अंधार, धुके आणि पाऊस आदी) सविस्तर माहितीची नोंद या अ‍ॅपमध्ये पोलिसांकडून केली जाणार आहे. या अ‍ॅपमध्ये नोंद केल्यानंतरची माहिती प्रादेशिक परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पाठविण्यात येणार असल्याचे ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

प्रादेशिक विभागाचे काम-

आयआरएडी अ‍ॅपमध्ये नोंद केलेली माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित वाहनांची तपासणी होईल. त्यानंतर त्या वाहनांवर योग्य ती कारवाई करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तयार केला जाईल. उदा. ब्रेक, इंजिन, साईड मिरर किंवा हेडलाईट नसणे आदींच्या माहितीचा यात समावेश असेल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

..........

आरोग्यविषयक सुविधा - घटनास्थळी कोणत्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होत्या. (उदा. प्रथमोपचार) आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नसल्यास त्या किती कालावधीत दिल्या गेल्या, त्या पुरविण्यास विलंब होण्याचे कारण, तसेच तातडीने यास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील आणि त्यास किती कालावधी लागेल, याचाही अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडून तयार करण्यात येईल.

.....

सार्वजनिक बांधकाम विभाग - घटनास्थळाचे परीक्षण करून अपघात होण्याचे कारण - उदा. रस्ता वाहतुकीस योग्य आहे किंवा नाही, धोकादायक वळण, उतार अथवा चढण, खड्डे इत्यादीबाबत सविस्तर अहवाल तयार करून त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.