जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळा द्विशिक्षकी असून, शिपायापासून लिपिकापर्यंत सर्व भूमिका शिक्षकांनाच वाठवाव्या लागतात. शाळेतील मुख्य शिक्षक शैक्षणिक कामाच्या बोजाखाली दबला असल्याने तो विद्यार्थ्यांना काय शिकवणार, हा एक मोठा प्रश्न आहे. शाळेतील दुसऱ्याच्या एका शिक्षकावर प्रसंगी चार-चार वर्गांना अध्यापनाची कसरत करावी लागते; पण अशैक्षणिक कामांमुळे अतिशय कोवळ्या अशा बालमनाचा विचार करणारे मानसशास्त्र व शिक्षणशास्त्रातील सिद्धांताची प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते.
४) एकशिक्षकी शाळेचे हाल-
एकशिक्षकी शाळेत तर शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायचे की, ऑनलाइन कामे उरकायची की, वेगवेगळी अशैक्षणिक काम करायची, या विवंचनेत त्या शिक्षकांचे मानसिक संतुलन बिघडले नाही तर नवलच.
शिक्षक संघटना काय म्हणतात?
‘अनेक अशैक्षणिक कामे असतानाही शिक्षक आपले कौशल्य वापरून विद्यादानाचे काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. त्याचीच परिणीती म्हणून महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल असल्याचे राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणातून उघड झाले आहे. चारित्र्यसंपन्न पीढी, समाजनिर्मितीमध्ये शिक्षकांचे योगदान लक्षात घेता शिक्षकांचा आत्मसन्मान, प्रतिष्ठेस ठेच लागेल अशी अशैक्षणिक कामे शिक्षकांना देण्यात येऊ नयेत. शिक्षकांचा जॉब कार्ड निश्चित करावा.’
-विनोद लुटे
अध्यक्ष-ठाणे जिल्हा जुनी पेन्शन हक्क संघटन.
--
१) भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांना फक्त शिकऊ द्या. ही आमची जुनी मागणी आहे; परंतु शिक्षकांना कुणीच वाली उरला नसून बिचारी गाय कुणीही हाका, अशी सध्याची परिस्थिती आहे. शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे. शिवाय शिक्षकांचे अवमूल्यन होत असून, हे सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी बरे नव्हे.
-विजय शिंदे, राज्य सहकार्यवाह, शिक्षक भारती