लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वागळे इस्टेट येथील सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रा. लि. या कंपनीतून कॉपरच्या केबलसह एक लाख ३७ हजारांच्या ऐवजाची वर्षभरापूर्वी चोरी करणाºया निखील उर्फ प्रविण किशोर पटेल (३०, रा. संत ज्ञानेश्वरनगर, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.तीन हात नाका येथील सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रा. लि. या कंपनीत १२ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० ते १९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान चोरी झाली होती. चोरटयांनी रघुनाथनगरकडे जाणाºया नाल्यातून कंपनीच्या प्लान्ट एकमधील मेन्टनन्स इलेक्ट्रीकल डिपार्टमेंट मध्ये पत्रा तोडून कंपनीमध्ये शिरकाव केला होता. या घटनेत ३० इलेक्ट्रीकल मोटर्स आणि कॉपर केबल्स असा एक लाख ३७ हजारांचा ऐवज चोरल्याची तक्रार कंपनीचे व्यवस्थापक विठ्ठल सस्ते यांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात १९ डिसेंबर रोजी दाखल केली होती. या गुन्हयाचा तपास वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, निरीक्षक विजय मुतडक आणि सहायक पोलीस निरीक्षक अरविंद वळवी, हवालदार मोरे, पोलीस नाईक अरुण बांगर, नितीन बांगर आदींच्या पथकाने केला. सीसीटीव्हीतील चित्रण, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे निखील उर्फ प्रविण याला या पथकाने अटक केली. त्याने त्याच्या अन्य एका साथीदाराच्या मदतीने ही चोरी केल्याची कबूली पोलिसांना दिली. त्याच्याकडून चोरीतील ऐवज हस्तगत करण्यासाठी त्याच्याकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वागळे इस्टेट येथील एका कंपनीत चोरी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 10:57 PM
ठाण्यातील वागळे इस्टेट येथील सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रा. लि. या कंपनीतून कॉपरच्या केबलसह एक लाख ३७ हजारांच्या ऐवजाची वर्षभरापूर्वी चोरी करणाºया निखील उर्फ प्रविण किशोर पटेल (३०) याला वागळे इस्टेट पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.
ठळक मुद्दे कॉपरच्या केबलसह एक लाख ३७ हजारांच्या ऐवजाची चोरी वागळे इस्टेट पोलिसांची कामगिरी