शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

ठाण्यातील औषधाच्या दुकानातून दोन लाखांची रोकड चोरणाऱ्या नोकरास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 10:32 PM

औषधांच्या घाऊक विक्री केंद्रातून दोन लाखांच्या रकमेची चोरी करणाºया त्याच दुकानातील दीपक कुकरेजा (२४, रा. उल्हासनगर) या कमिशनवर काम करणाºया नोकराला नौपाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांनी केली कारवाई दोन टक्के कमिशनवर करायचा काम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नौपाड्यातील विष्णुनगर येथील संग्राम एंटरप्रायजेस या औषधांच्या घाऊक विक्री केंद्रातून दोन लाखांच्या रकमेची चोरी करणा-या त्याच दुकानातील दीपक कुकरेजा (२४, रा. उल्हासनगर) या नोकराला नौपाडा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्याला बुधवारी ठाणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विष्णुनगर भागात सौमित्र जोशी यांचे ‘अपोलो’ इमारतीमध्ये हे औषधांचे दुकान आहे. याठिकाणी ३० ते ४० कामगार आहेत. अलिकडेच त्याठिकाणी नोकरीसाठी आलेल्या दीपकला जोशी यांनी कमिशन तत्वावर नियुक्त केले होते. दिवा आणि मुरबाड परिसरातील मेडिकल दुकानांमध्ये औषधांची बुकिंग करून त्यांना औषधपुरवठा करण्याचे काम त्याच्याकडे सोपविले होते. प्रत्येक महिन्याला बिलावर त्याला दोन टक्के कमिशन देण्यात येणार होते. सुरुवातीला दोन ते तीन दिवस त्याने चांगल्या प्रकारे काम केले. त्यानंतर ५ आॅक्टोबर ते २४ नोव्हेंबर २०१९ या काळात पुरविलेल्या औषधांच्या बिलांची दोन लाखांची वसुली जोशी यांच्याकडे जमा न करता परस्पर स्वत:कडेच ठेवली. ही बाब लक्षात आल्यानंतर संबंधित मेडिकल दुकानांमध्येही जोशी यांनी विचारणा केली. तेंव्हा दीपक याच्याकडे या रकमा जमा केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, दीपक याला त्यांनी संपर्क साधला असता, तो पसार झाला होता. अखेर याप्रकरणी जोशी यांनी त्याच्याविरुद्ध १३ डिसेंबर रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला. ही तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने १७ डिसेंबर रोजी त्याला उल्हासनगर येथून अटक केली. त्याच्याकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी