कल्याण, दि. 10 - कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजपचे नगरसेवक दया गायकवाड यांनी लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला असल्याचा आरोप ठाण्यातील एका तरुणीने केला आहे. याप्रकरणी तरुणीने पोलिस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला आहे. बलात्काराच्या गंभीर आरोपामुळे भाजप नगरसेवक वादाच्या भोव:यात सापडला आहे. गायकवाड याला अन्य दोन जणांनी मदत केल्याचाही उल्लेख तरुणीने तक्रार अर्जात केला आहे. दरम्यान नगरसेवकाच्या पत्नीने तरुणीच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
तरुणीने केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, तरुणीशी दया गायकवाड सोबत फेसबूकवर ओळख झाली. त्यानंतर ते एका ठिकाणी भेटले. त्यानंतर दया गायकवाडने तिला टिटवाळा व बदलापूर येथे लॉजवर नेऊन तिच्याशी शरीर संबंध ठेवले. लग्नाचे आमिष दाखवून दयाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. दया व त्याचे अन्य दोन साथीदार तरुणीचा छळ करीत आहे. या प्रकरणी दयासह अन्य दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास करण्याचा तक्रार अर्ज तरुणीने केला आहे.
दरम्यान यासंदर्भात नगरसेवक दया गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधीत तरुणीने फेसबूकवर फ्रेण्डस रिक्वेस्ट पाठविली होती. तेव्हढीच तिच्यासोबत माझी ओळख आहे. त्यानंतर तिची आई व तिने माङयाकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर मला ती फोन करुन धमाकावित राहिली. या प्रकरणी माङया पत्नीने तिच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे. तिच्याकडून ब्लेकमेल सुरु असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.