लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून साथीदारांच्या मदतीने भांडूप येथील पप्पू उर्फ इसरार सय्यद (२८, रा. भांडूप) यांच्यावर तौसिफ अश्रफ इनामदार (२७) याने ब्लेड आणि बर्फ फोडण्याच्या टोचण्याने खूनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर तो गेल्या आठ महिन्यांपासून पसार झाला होता. त्याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने गुरुवारी अटक केली.पप्पू सय्यद यांचा मित्र जावेद याच्यावर २ फेब्रुवारी २०२० रोजी आवेझ इनामदार, फिरोज उर्फ चिकना, निबराजन कोणार आणि तौसिफ इनामदार यांनी हल्ला केला होता. मुलूंड गोरेगाव लिंक रोडवरील भांडूप येथील लाजीज हॉटेल येथे जावेद यांची या चौघांसोबत भांडणे झाली होती. हीच भांडणे सोडविण्यासाठी पप्पू सय्यद यांनी मध्यस्थी केली. याचाच राग आल्याने या चौघांनी २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीनंतर ब्लेड आणि टोचाच्या सहाय्याने सय्यद यांच्यावर खूनी हल्ला केला. यात ते गंभीर गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक झाली होती. या प्रकारानंतर इनामदार हा फरार झाला होता. गेल्या आठ महिन्यांपासून मुंबई पोलिसांना गुंगारा देणारा इनामदार ठाण्यातील मूस चौक स्टेशन रोड येथे येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस नाईक अमोल देसाई यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे १७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव, पोलीस हवालदार आनंदा भिलारे आणि पोलीस नाईक देसाई आदींच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.त्याला पुढील तपासासाठी भांडूप पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतून खूनी हल्ला करुन पसार झालेला आरोपी अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 8:11 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून साथीदारांच्या मदतीने भांडूप येथील पप्पू उर्फ इसरार सय्यद (२८, ...
ठळक मुद्दे ठाणे गुन्हे शाखेची कारवई आठ महिन्यांपासून मुंबई पोलिसांना दिला गुंगारा