शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

खून प्रकरणी आरोपीला दहा वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 10:13 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अगदी क्षुल्लक कारणावरुन कोयत्याने वार करुन जयराम जानू कव्हा (५८, रा. उंबरखेडा, जि. पालघर) ...

ठळक मुद्देठाणे सत्र न्यायालयाचे आदेशपालघर जिल्हयातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अगदी क्षुल्लक कारणावरुन कोयत्याने वार करुन जयराम जानू कव्हा (५८, रा. उंबरखेडा, जि. पालघर) याचा खून करणाऱ्या हेमंत मोरघा या आरोपीला दहा वर्ष सक्त मजूरीची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी बुधवारी सुनावली आहे. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी आणि पुराव्याच्या आधारे ही शिक्षा सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली.तीन वर्षापूर्वी घडलेल्या या खून प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जव्हारमधील उंबरखेडा गावातील रहिवाशी हेमंत हा २९ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गावातील जयराम कव्हा यांच्या घरासमोरील अंगणात उभा होता. त्यावेळी तो कोयत्याने स्वत:ची जीभ कापण्याचा प्रयत्न करीत होता. तेंव्हा जयराम यांनी जीभ का कापतो, वेड्यासारखा का करतो? असे त्याच्याजवळ जाऊन त्याला सुनावले. याचाच राग हेमंतला आला. त्याने या रागाच्या भरात कोयत्याने जयराम यांच्यावर वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करुन जव्हार पोलिसांनी हेमंतला अटकही केली. पोलिसांनी कलम ३०२ अन्वये हेमंतविरु द्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. परंतू, आरोपीचा हत्या करण्याचा उद्देश नव्हता. त्यामुळे न्यायाधीश जोशी यांनी कलम ३०४ भाग एक या कलमाखाली त्याला दोषी ठरवून दहा वर्ष कारावास आणि दोन हजार रु पये दंडही ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे उज्वला मोहोळकर यांनी तर तपासी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक घनशाम आढाव यांनी काम पाहिले.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयMurderखून