लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: झाडाच्या मालकीवरुन उद्भवलेल्या वादातून एका महिलेचा खून तसेच तिच्या पतीवर खूनी हल्ला करणाºया सुनिल लक्ष्मण कामडी या आरोपीला ठाणेन्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजारांचा दंड तसेच खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा तसेच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजूरीची तसेच तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.पालघर जिल्हयातील जव्हार तालुक्यातील डेंगाचीमेट या गावातील शेतामधील काजूच्या झाडाखाली १६ मार्च २०१८ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा खूनाचा प्रकार घडला होता. लक्ष्मण गोपाळ वाघेरा (४०) हे वडिलांनी शेतावर लावलेल्या काजूच्या झाडाच्या फांद्या तोडत होते. तर त्यांची पत्नी सकु वाघेरा (३५) या झाडाखाली या फांद्यांचा पाला गोळा करीत होत्या. मात्र, हे झाड आपले असल्याचा दावा करीत तिथे अचानक आलेल्या आरोपी सुनिल कामडी याने सकु हिच्या डोक्यात काठीने प्रहार केला. त्यावेळी तिचा पती लक्ष्मण हा वाद सोडविण्यासाठी गेला असता, त्याच्याही डोक्यात त्याने प्रहार केला. दरम्यान, सकु हिला उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात सकु हिच्या खूनाचा तसेच तिचा पती लक्ष्मण याच्या खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. याच खून प्रकरणाचा पोलीस निरीक्षक डी. पी. भोये यांनी तपास केला. यात सुनिल कामडीला अटक झाली होती. याच खटल्याची सुनावणी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांच्या न्यायालयात १४ आॅक्टोबर रोजी झाली. जिल्हा सरकारी वकील लोंढे यांनी सबळ पुरावे सादर केले. त्यानंतर आरोपीला न्यायालयाने खूनासाठी जन्मठेप आणि पाच हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजूरीची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्हयात पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. पोलीस नाईक वाय. आर. पाचोरे यांनी न्यायालयीन प्रक्रीयेसाठी पाठपुरावा केला.
महिलेच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:37 PM
झाडाच्या मालकीवरुन उद्भवलेल्या वादातून एका महिलेचा खून तसेच तिच्या पतीवर खूनी हल्ला करणाऱ्या सुनिल लक्ष्मण कामडी या आरोपीला ठाणे न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजारांचा दंड तसेच खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा तसेच पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
ठळक मुद्देजव्हार येथील घटनाठाणे न्यायालयाने सुनावली शिक्षा