लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जवळच्या नात्यातील एका १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मदन वाघे (३३, रा. तुर्भे, नवी मुंबई) याला ठाण्याच्या विशेष पोस्को न्यायाधीश वि.वि. वीरकर यांनी शनिवारी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे, यातील तक्रारदार पीडितेची आई आणि पीडित मुलीने ऐनवेळी साक्ष फिरवली होती. तरीही न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे ही शिक्षा सुनावली.पीडित मुलगी जवळची नातेवाईक असल्यामुळे तुर्भे येथे याच आरोपीच्या घरी वास्तव्याला होती. आईला ठार मारण्याची धमकी देत मदन याने तिच्यावर २२ जानेवारी २०१८ ते ३० जानेवारी २०१८ या काळात चार वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार यादवनगर, आदिवासी वाघ्रीपाडा, डोंगराजवळ रबाळे एमआयडीसी भागात घडला होता. याप्रकरणी ३१ जानेवारी २०१८ रोजी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्कारासह लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये आरोपी मदन याला पोलिसांनी अटकही केली होती. दरम्यान, या खटल्याची सुनावणी न्या. वीरकर यांच्या न्यायालयात ११ डिसेंबर रोजी झाली. त्यावेळी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी ११ साक्षीदार तपासले. मात्र, फिर्यादी आणि पीडिता यांनी त्यांची साक्ष फिरवली. तरीही आधी न्यायालयासमोर १६४ प्रमाणे झालेली पीडितेची साक्ष तसेच वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी मदन याला पोस्को कायद्यांतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ५० दिवस अतिरिक्त साध्या कैदेचीही शिक्षा सुनावण्यात आली.
नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस सश्रम कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 12:51 AM
नात्यातील एका १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या मदन वाघे (३३, रा. तुर्भे, नवी मुंबई) याला ठाण्याच्या विशेष पोस्को न्यायाधीश वि.वि. वीरकर यांनी शनिवारी पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
ठळक मुद्देठाणे विशेष न्यायालयाचे आदेश नवी मुंबईतील घटना