लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: जेवण्याच्या उधारीवरून झालेल्या वादातून राजू पटेल उर्फ सुदामा (२६) याचा खून करणाºया आशु छोटेलाल बर्मन (२५) या कथित आरोपीला कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी अवघ्या काही तासांमध्येच अटक केली. त्याला २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.जेवणाचे उधार राहिलेले पैसे देण्याच्या कारणावरुन राजू आणि आशु यांच्यात गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वाद झाला. यातूनच राजू या सफाई कामगार मित्राची आशुने डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केला होता. हा प्रकार घोडबंदर रोड येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये मागील घडला होता. या मारहाणीनंतर राजूला ठाणे जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आशु विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतत तो परराज्यात पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्याला पळून जाण्याची संधी न देता अवघ्या दोन तासांमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चौधरी यांनी त्याला अटक केली. वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
मित्राच्या खूनानंतर परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असतांनाच आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 7:47 PM
जेवण्याच्या उधारीवरून झालेल्या वादातून राजू पटेल उर्फ सुदामा (२६) याचा खून करणाऱ्या आशु छोटेलाल बर्मन (२५) या कथित आरोपीला कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी अवघ्या काही तासांमध्येच अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कामगिरी जेवणाच्या उधारीवरुन झाला वाद