पंकज रोडेकरठाणे : आई रागावल्याचा राग मनात धरून अवघ्या अकरावर्षीय अककलकोटच्या समर्थने घर सोडण्याचा निर्णय घेत मुंबई गाठली. मुंबईत भटकत असताना, त्याला चाइल्ड लाइन या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाºयांनी पकडून बालगृहात दाखल केले. तेथे काही दिवस काढल्यानंतर, आता तो ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या मदतीने स्वगृही परतला आहे.अपहरण झालेली मुले मुली तसेच बालगृहात दाखल असलेल्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी ठाणे शहर पोलीस दलातील प्रशासन विभागाचे सहा. पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक यशवंत सोनावणे यांच्या पथक ातील पोलीस हवालदार प्रतिमा मनोरे आणि पोलीस नाईक रोहिणी सावंत, कैलास जोशी ही मंडळी मानखुर्द बालगृहात गेले होते. तेथील इतर मुलांची चौकशी करत असताना समर्थ याच्याकडेही त्याच्या आईवडिलांची विचारपूस केली. सुरुवातीला तो काही बोलण्यास तयार नव्हता. पण, पथकाने त्याचा विश्वास संपादन केल्यावर त्याने आपण, अक्कलकोट रहिवासी असल्याचे सांगितले. वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून आई नानणी गावात घरकाम करते. ती रागवायची म्हणून समर्थ अक्कलकोटवरून सोलापूर रेल्वे स्थानकात आला. तेथून गाडीत बसून थेट मुंबई गाठली. मुंबईत फिरत असताना मुलांसाठी काम करणाºया संस्थेच्या पदाधिकाºयांनी पकडून त्याला मानखुर्द बालगृहात आणले. तेव्हापासून तो बालगृहात १० ते १५ दिवस वास्तव्यास होता. दरम्यान, येथील पदाधिकाºयांनी त्यांची विचारपूस केल्यावर तो कोणाशीही बोलत नव्हता, असे पोलीस म्हणाले.
अकरावर्षीय समर्थ सापडला मुंबईत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:55 AM