शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

एसीपी निपुंगेंना उच्च न्यायालयाचा दिलासा: अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 10:28 PM

अखेर महिला पोलीस आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी तथा ठाणे पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना काही अटी शर्थींवर मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

ठाणे : अखेर महिला पोलीस आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी तथा ठाणे पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांना काही अटी शर्थींवर मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणातून काही अंशी तरी दिलासा मिळाला आहे. अर्थात, या प्रकरणात त्यांची पोलीस उपायुक्तांमार्फत प्राथमिक चौकशी मात्र सुरू आहे.तपास अधिकाºयांना संपूर्ण सहकार्य करावे, ते बोलवतील त्यावेळी चौकशीला हजर राहावे, अशा अनेक अटींवर १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांचा हा जामीन उच्च न्यायालयाने मंजूर केला. यापूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीन ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. बावनकर यांनी अलिकडेच फेटाळला. त्यानंतर त्यांनी ३ आॅक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात त्यासाठी अर्ज केला होता. ६ सप्टेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिने आत्महत्या केली. त्यानंतर ते भूमिगत झाले होते. भूमिगत राहूनच त्यांनी आधी ठाणे न्यायालयात त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आपला तिच्या आत्महत्येच्या प्रकरणाशी संबंध नसून तिचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल फापाळे (तिचा भावी पती) याच्याबरोबर भांडण झाले होते. तो याप्रकरणात सहआरोपी असून त्याला अटकही झाली आहे, असे काही मुद्दे निपुंगे यांच्या वकीलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच फोन कॉल्स दोन्ही बाजूंकडून झालेत का? अशा अनेक बाजू पडताळण्यात आल्या. ९ आॅक्टोबर रोजी ही बाजू ऐकल्यानंतर ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना तातडीने त्यावर उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. त्यासाठी ठाणे पोलिसांनी एक दिवसाचा अवधी मागितला. मात्र, दरम्यानच्याच काळात काही अटी शर्थींवर त्यांचा हा जामीनही न्यायालयाने मंजूर केला. याची त्यांनी रितसर माहिती सोमवारी कळवा पोलिसांना हजर होऊन दिली. त्यामुळे पवार आत्महत्येच्या प्रकरणानंतर ते प्रथमच तब्बल ४० दिवसांनी तपास अधिकाºयांसमोर हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी आता निपुंगे यांचाही जबाब नोंदविण्याची प्रक्रीया सुरू केल्याची माहिती कळवा विभागाचे प्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी दिली.दरम्यान, निपुंगे हे अद्यापही मुख्यालयात किंवा नियंत्रण कक्षात हजर झाले नसल्याची माहिती मुख्यालयाच्या उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी ‘लोकमत’ला दिली. तर त्यांच्याविरुद्ध याच प्रकरणाची प्राथमिक चौकशी शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याकडून सुरू आहे. यात चार जणांचे जबाब नोंदविले गेले असून हा अहवाल एक महिन्याच्या आत त्यांना पोलीस आयुक्तांकडे सादर करायचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली..........................

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय