ठाणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला ठाण्यात ३२० वाहने खरेदी झाल्याची नोंद ठाणे प्रादेशिक परिवहन विभागात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक दुचाकी वाहने असली, तरी चारचाकी वाहनांचाही तितक्याच प्रमाणात समावेश आहे. गुढीपाडव्याच्या तुलनेत अक्षयतृतीयेला ठाणेकरांनी वाहने काही प्रमाणात कमी खरेदी केल्याचे दिसते.ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत नुकतीच वाहनांच्या आॅनलाइन नोंदणीला सुरुवात झाली आहे. ठाण्यात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ३४५ वाहनांची नोंदणी झाली असून यामध्ये सर्वाधिक दुचाकी वाहनांचा समावेश आहे. वाहन ०४ नावाचे अद्ययावत ई-रजिस्ट्रेशन सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याद्वारे वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत थेट आॅनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. ठाण्यात शुक्रवारी रात्री ८ वाजेपर्यंत ३२० वाहनांची नोंदणी झाली होती, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
अक्षयतृतीयेला ठाण्यात ३२० वाहनांची खरेदी
By admin | Published: April 29, 2017 1:36 AM