ठाणे : तंत्रज्ञानाचा वाढलेला अतिवापर मानवी जीवनाचा कशा पद्धतीने ऱ्हास करू शकतो यावर आधारित "मी मोबाईल आणि फॅमिली" हे नाटक अभिनय कट्टयावर सादर करण्यात आले.यात मोबाईल एक व्यसन झाले असून त्याला वेळीच आवर घातला पाहिजे हे प्रबोधनाच्या माध्यमातून सांगण्यात आले.यंदाचा हा ४०३ क्रं चा अभिनय कट्टा होता.
मोबाईलचा जन्म कसा झाला व पुढे त्याचा लोक जीवनावश्यक वस्तू म्हणून उपयोग करू लागले.तसेच या तंत्रज्ञानाने माणसाचा शंभर टक्के भाग व्यापून टाकला असून मोबाईल वेड हे व्यसनात परिवर्तित होत आहे.शरीराचा एक भाग म्हणून मोबाईलचा वापर करताना लोक अगदी झोपताना,दात घासताना आणि बाथरूम मध्ये देखील मोबाईल वापरतात. पूर्वी केवळ संवाद साधायचे माध्यम म्हणून मोबाईल वापरला जात होता.मात्र गेल्या काही वर्षात फेसबुक,व्हाटसअप या गोष्टींचा भडिमार मोठयाप्रमाणात होत असून मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येताना दिसत आहे.अगदी लहानमुलापासून ते वयोवृद्ध देखील दिवसातून दर दोन मिनिटांनी सतत आपला मोबाईल चेक करत असतात. या नाटकाच्या माध्यमातून मोबाईलचा सदुपयोग व दुरुपयोग दाखवण्यात आला आहे.यात रुपाली वीरकर,अर्णव राजे,हर्षदा दाते,ऋतुजा भडसावळे,जयेश राजे इत्यादी कलाकारांनी यात काम केले.याचे संगीत सिद्धेश दळवी याने केले होते.लेखन आणि दिग्दर्शन जसुराज यांनी केले होते. यावेळी कट्ट्याचे निवेदन कल्पेश डुकरे याने केले व दीपप्रज्वलन माधव धामणकर यांनी केले. यावेळी अभिनय कट्ट्याच्या कालाकारांनी "अशा है" या गाण्यावर नृत्य सादर करत उपास्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कुणाल पगारे याने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले होते. मोबाईल जीवनावश्यक वस्तू जरूर आहे पण आपण तंत्रज्ञान बनविले आहे.तंत्रज्ञानाने अपल्याला बनवले नसून गरजेपुरताच त्याचा वापर करावा. मोबाईल वर बोलण्यापेक्षा एकमेकांशी भेटून संवाद साधण्यातच आपलेपणा आहे,असे अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांगितले.