ठाणे: ज्या वयात मुलांच्या हातात स्मार्टफोन असतात. त्याच वयात एक चौदा वर्षांचा मुलगा हाताशी कॅमेरा बाळगत, धडपडत शॉर्टिफल्मची वारी करत आहे. अथर्व नाकती असे या हरहुन्नरी कलाकाराचे नाव असून नुकत्याच झालेल्या ‘एम ट्रेन व्हिडिओ मेकिंग’ स्पर्धेत अभिनय कट्ट्याच्या अथर्वने प्रथम क्र मांक पटकावला आहे. या स्पर्धेत देशभरातून हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पंचवीस हजार रु पये इतके होते. मंगळवारी हे पारितोषिक जाहीर करण्यात आले.एम इंडिकेटर विभागाने एम ट्रेन हा अँप नुकताच लॉंच केला. या अँप मार्फत ही स्पर्धा घेण्यात आली होती. या अँप मध्ये रेल्वेच्या सर्व सुविधांची माहिती मिळते. या स्पर्धेत स्पर्धकास एम ट्रेन अॅपबद्दल किमान दहा मिनिटांचा व्हिडिओ बनवून पाठवने आवश्यक होते. मे महिन्यात ही स्पर्धा घेण्यात आली होती. देश भरातील हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अथर्वने ही स्पर्धा जिंकत अभिनय कट्ट्याचे नाव केवळ राज्यातच नाही तर देशात पोहचवले आहे.अथर्व ने स्वत:चा "सुपर तडका" हा युट्युब चॅनल सुरु केला असून त्याने अभिनय कट्ट्याच्या कलाकारांना सोबत घेऊन अनेक लघुपट बनवले आहेत. या स्पर्धेतील लघुपटात देखील अथर्वने कट्ट्याचे संकेत देशपांडे, आरती ताथवडकर, चिन्मय मौर्य, अभिषेक सावळकर या कलाकारांना घेऊन काम केले आहे. स्पर्धेसाठी अथर्वने खूप मेहनत घेतली होती. त्याने आतापर्यंत बऱ्याच स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली आहेत. ठाणे महापालिके अंतर्गत घेण्यात आलेल्या कला-क्रीडा महोत्सवात २०१६ साली अथर्वला ‘रोअर’ या लघुपटसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. तसेच ‘रोअर’या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे. ब्लूव इंटरटेनमेंट या प्रोडक्शन मार्फत भरविण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत अथर्वला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आहे. त्याने आतापर्यंत उंच माझा झोका, का रे दुरावा, गणपती बाप्पा मोरया, गंध फुलांचा गेला सांगून अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. झी मराठी दिशा साप्ताहिकाच्या जाहिरातीत त्याने काम केले आहे. स्लॅमबुक, सिंड्रेला अशा अनेक सिनेमांमध्ये कलाकार म्हणून काम केले आहे. अभिनयासोबतच लेखन, छायाचित्रण, संकलन आणि दिग्दर्शनात अथर्वची वाटचाल सुरु आहे. ठाण्याच्या भगवती विद्यालयात तो दहावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. त्याने शाळेतर्फेकंझ्युमर क्लबमार्फत राबवण्यात आलेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक असे पुरस्कार मिळवले. अथर्वच्या या कामिगरीने त्याचे पालक आणि शाळेतील शिक्षक आनंद व्यक्त करत आहेत.
अभिनय कट्ट्याच्या अथर्व नाकतीने जिंकला एम ट्रेन व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटीशन २०१८ चा किताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 4:17 PM
ठाण्यातील अभिनय कट्ट्याच्या अथर्व नाकतीने ‘एम ट्रेन व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटीशन’ २०१८ चा किताब जिंकला
ठळक मुद्देअथर्व नाकतीने जिंकला एम ट्रेन व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटीशन २०१८ चा किताब मंगळवारी स्पर्धेचे पारितोषिक जाहीरअथर्वला ‘रोअर’ या लघुपटसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार