शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडल्या  'शब्दवेड्या भावना..', कट्टा निघाला काव्यरंगात न्हाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 4:51 PM

अभिनय कट्टा क्रमांक ४४७ वर शब्दातून उलगडल्या शब्दवेड्या भावना.

ठळक मुद्देठाण्यातील अभिनय कट्ट्यावर उलगडल्या  'शब्दवेड्या भावना..'कट्टा निघाला काव्यरंगात न्हाऊनसामान्य माणसाच जीवन ह्याच शाब्दिक भावविश्व अलगद उभं करतात : किरण नाकती

ठाणे : कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ असलेल्या कट्टा क्रमांक ४४७ अभिनय कट्टा काव्यरंगात न्हाऊन निघाला. नवोदित कलाकारांसाठी स्वतःच्या कलागुणांना सादर करून आत्मविश्वास मिळवून देणार टॉनिक म्हणजे अभिनय कट्टा. अभिनय कट्ट्याचा कलाकार परेश दळवी ह्याच्या कवितांचे अभिवाचिक सादरीकरण म्हणजे 'शब्दवेड्या भावना'. अनेक अबोल भावनांना शब्दामधून अनुभवण्याची एक काव्यमय संध्याकाळ म्हणजे 'शब्दवेड्या भावना'.

    अभिनय कट्ट्यावर आजवर लेखन, अभिनय,  नेपथ्य अशा विविध क्षेत्रात आपल्या कामाने प्रामाणिकपणे रंगभूमीची सेवा करताना स्वतःमधील कलाकाराला सजक घडवणारा अभिनय कट्ट्याचा कलाकार परेश दळवी ह्याच्या कवितांचे उलगडत जाणारे भावविश्व म्हणजे *'शब्दवेड्या भावना'.* 'शब्दवेड्या भावना' म्हणजे आयुष्यातील विविध व्यक्त अव्यक्त भावभावनांच शाब्दिक चित्रण. प्रेम,विरह, नात्यांमधील बंध, जिद्द, आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन म्हणजे 'शब्दवेड्या भावना'.सादर कार्यक्रमात परेश दळवींच्या *मी अजून चालत आहे,प्रेम,अस जगावं, नाद नाही करायचा,प्रेयसी,अबोल पत्र,एकांत,ओळखलंत का मॅडम मझला, तो एक क्षण, शेवटचे कर्ज, माझी सखी, नदीकिनारी, माझी आई, देवयानी, नजर, गम, शायर, फर्स्ट इयर का प्यार अनपेक्षित तू* या कवितांचं सादरीकरण परेश दळवी, आदित्य नाकती, कदिर शेख आणि न्युतन लंके ह्यांनी अभिवाचिक सादरीकरण केले. आजचा कट्टा खरचअभिनय कट्टा तसेच प्रत्येक कट्टेकऱ्यासाठी विशेष होता कारण अभिनय कट्ट्याचा कलाकार परेश दळवी ह्याच्या कवितांचे सादरीकरण 'शब्दवेड्या भावना' सादर झाल्या.परेश च्या कविता ह्या प्रत्येकाला कुठेतरी मनाच्या जवळच्या  वाटल्या कारण त्या प्रेम, विरह, मैत्री, पाऊस, आई, वडील आणि नात्यातील बांध आणि सामान्य माणसाच जीवन ह्याच शाब्दिक भावविश्व अलगद उभं करतात असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी केले. सदर कार्यक्रमात अभिनय कट्टा बालसंस्कार शास्त्राचे बालकलाकार श्रेयस साळुंखे, चिन्मय मौर्य,आदित्य भोईर,स्वस्तिका बेलवलकर, अद्वैत मापगावकर, पूर्व तटकरे, रुचिता भालेराव, सई कदम  यांनी सुद्धा विविध कवितांचे सादरीकरण केले. सदर कार्यक्रमाचे निवेदन किरण नाकती ह्यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक