ठाणे - ठाणे शहरातील डीपी रोड अंमलबजावणी करणे तसेच रस्ता रुंदीकरणाअंतर्गत बाधित बांधकामांवर दोन दिवसात कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले होते. त्यानुसार शुक्र वारी सकाळी वाघबीळ गाव घोडबंदर मार्गावरील व्यावसायिक ५९ आणि १३ निवासी बांधकामावर पालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फतमोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हातोडा टाकण्यात आला. पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विकास योजनेतंर्गत रस्ते आणि ज्या ठिकाणी रस्ते रूंदीकरणाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी दोन दिवसांत कारवाई प्रस्तावित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पहिली कारवाईची मोहीम ही दिव्यातून सुरु होणार होती. परंतु येथील रहिवाशांनी कारवाईच्या विरोधात आवाज उठविल्याने पालिकेने आपला मोर्चा थेट घोडबंदरकडे वळविला. त्यानुसार शुक्रवारी सकाळी वाघबीळ गावकडे जाणाºया डीपी रस्त्यामध्ये असलेल्या बांधकामांवर कारवाई केली. यामध्ये ५९ व्यावासियक आणि १३ रहिवासी बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर या कारवाईच्या वेळेस आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वत: हजेरी लावली होती. तसेच यावेळी त्यांच्याबरोबर नगरअभियंता खांडपेकर अतिक्र मण विभागाचे उपायुक्त अशोक बुरफुले, उपायुक्त संदीप माळवी आदी उपस्थित होते.शनिवारी वागळेत पडणार हातोडाघोडबंदर भागातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यानंतर आता शनिवारी वागळे पट्यात कारवाईचा मोर्चा वळविला जाणार आहे. परंतु यापूर्वी सुध्दा तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांच्या काळात येथे कारवाईचा प्रयत्न झाला. परंतु कारवाईच्या वेळेस येथील रहिवासी रस्त्यावरच झोपले होते. त्यामुळे याठिकाणी काही काळ वादंग निर्माण झाला होता. आता पुन्हा पालिकेने या भागाकडे आपले लक्ष केंद्रीत केले असून, नामदेववाडी टी.पी.स्कीम रस्ता, रस्ता क्र . ३३ वागळे इस्टेट कामगार हॉस्पिटल ‘रस्ता व रस्ता क्र .१६ या रस्त्यावरील एकूण ८०० रहिवासी व ३३८ वाणिज्य बांधकामांवर कारवाई करणार आहे. आता ही कारवाई यशस्वी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महापालिकेच्या माध्यमातून डीपी रस्त्यावरील ७२ अनाधिकृत बांधकामांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 3:04 PM
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शुक्रवार पासून पुन्हा रस्ता रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार वाघबीळ येथील डिपी रस्त्यात येणाºया ७२ बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला
ठळक मुद्दे५९ व्यावासायिक बांधकामांवर कारवाईशनिवारी वागळेत पडणार हातोडा