कल्याण : पदपथांवरील अतिक्रमणांविरोधात ‘लोकमत’ने वृत्त देताच खडबडून जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. ‘क’ प्रभाग क्षेत्रात मंगळवारी अशा अतिक्रमणांवर जेसीबी फिरवल्यानंतर गुरुवारी महापालिकेच्या ‘ब’ प्रभागक्षेत्र परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली. त्यात पदपथांवरील सहा बोर्ड, पत्र्यांच्या ६५ शेड, सात टपºया आणि १० बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
केडीएमसीने मंगळवारी ‘क’ प्रभागातील दुर्गामाता चौक ते शिवाजी चौक आणि महंमदअली चौक या रस्त्यांवरील पदपथांवर असलेली अतिक्रमणे हटवली. त्या कारवाईवेळी आयुक्त गोविंद बोडके स्वत: जातीने उपस्थित होते. पदपथांवर अतिक्रमण केलेल्या दुकानधारकांनी स्वत: वाढीव बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही बोडके यांनी दिला आहे.केडीएमसीन हाती घेतलेल्या या धडक कारवाईमुळे पादचाºयांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, नोटीस न देता कारवाईच्या अचानक उगारलेल्या बडग्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत व्यापाºयांमध्ये प्रचंड नाराजीही आहे. तसेच पूर्वसूचना न देता कारवाई केल्याबद्दल संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी व्यापाºयांनी पोलीस उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.दरम्यान, महापालिकेने गुरुवारी ‘ब’ प्रभागक्षेत्रातील पदपथांवरील अतिक्रमणांवर कारवाई केली. खडकपाडा सर्कल ते माधवसृष्टी तसेच साईचौक यासह अन्य १७ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण नियंत्रण विभागाचे सहायक आयुक्त सुहास गुप्ते व अन्य अधिकारी उपस्थित होते.अधिकारी, कर्मचारी खबºयांच्या भूमिकेत?च्गुरुवारी होणाºया कारवाईबाबत आधीच सूचना ‘ब’ प्रभागातील काही अधिकारी आणि कर्मचाºयांनी काही टपरीधारकांना दिली होती. त्यामुळे संबंधितांनी रातोरात टपºया पदपथांवरून गायब केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ही कारवाई एक प्रकारे दिखावा होती, अशीही चर्चा पालिका वर्तुळात आहे.च्त्यातच, ‘ब’ प्रभाग कार्यालय असो, अथवा प्रभागात मोठ्या प्रमाणावर ढाबे राजकीय आणि अधिकाºयांच्या आश्रयामुळे बिनदिक्कतपणे सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार, असाही सवाल उपस्थित होत आहे.केवळ सूचना दिली होतीकारवाईची आगाऊ खबर दिल्याची माहिती चुकीची आहे. ज्या टपरीधारकांकडे परवाना आहे, त्यांना तो बाळगण्याच्या सूचना केल्या होत्या. टपरी अधिकृत की बेकायदा, हे समजायला हवे, यासाठी तसे सांगण्यात आले होते. तर, कारवाई केवळ पदपथांवरील अतिक्रमणांविरोधातील होती. ढाब्यांसंदर्भातील कारवाई दुसºया टप्प्यात होईल, असा दावा ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी प्रकाश ढोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.