अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशामक केंद्राच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्याचे अतिक्रमण होते. तसेच अनेक लहान व्यापाऱ्यांनी या ठिकाणी टपऱ्या थाटून आपला व्यवसाय सुरू केला होता. मात्र आपत्कालीन परिस्थितीत या ठिकाणाहून अग्निशमन दलाची गाडी जाताना मोठ्या प्रमाणात अडथळे येत होते. अखेर हे अडथळे दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने या अनधिकृत टप्प्यांवर कारवाई केली आहे.
अंबरनाथ नगर पालिकेचे अग्निशमन यंत्रणा ही कोहजगावच्या नव्या अग्निशमन केंद्रात स्थलांतरित करण्यात आली आहे. शहरात एखाद्या ठिकाणी आग लागल्यास घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमनची गाडी चिंचपाडा- कोहजगाव नाका मार्गे शहराच्या इतर भागात जाते. मात्र कोहजगाव परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी बस्थान बांधले होते. अनेक टपऱ्या रस्त्याच्या दोन्हीही बाजूला थाटण्यात आले होते. तर अनेक व्यापाऱ्यांनी प्लास्टिकची शेड उभारून रस्ता अडवला होता. फेरीवाल्यांचा सर्व व्यवसाय रस्त्यावर सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद ठरत होता. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दलाची गाडी पोहोचण्यासाठी विलंब होत होता.
अनेक वेळा ताकीत देऊन देखील या ठिकाणचे फेरीवाले हटत नसल्याने आज पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई करत केली. यावेळी सर्व टप्प्यांवर तसेच रस्त्याच्या बाजूला असंलेले सर्व शेड तोडून टाकण्यात आले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या हात गाड्या कारवाईच्या आधीच सुरक्षित स्थळी हलवले होते. पालिकेच्या या कारवाईमुळे अग्निशामन दलाची गाडी जाण्यासाठी रस्ता मोकळा झाला असला तरी किती दिवस हा रस्ता मोकळा राहील हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे कारवाई झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी फेरीवाले