मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेने घोडबंदर येथील संक्रमण शिबीर परिसरातील अतिक्रमणावर मोठ्या बंदोबस्तात तोडक कारवाई केली. पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने संक्रमण शिबिरातील घुसखोरी आणि बेकायदा बांधकामाबाबत अतिक्रमण विभागास कारवाईसाठी पत्र दिले होते. त्या अनुषंगाने ५ जुलै रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
बांधकाम विभागाचे कर्मचारी सदाशिव ठणके व शृंगारे, कनिष्ठ अभियंता विकास शेळके व सुदर्शन काळे, लिपिक महेंद्र गावंड, फेरीवाला पथक कर्मचारी सचिन साळुंके व सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत, आरटीओ कार्यालय व संक्रमण शिबीर परिसरात कारवाई ही कारवाई करण्यात आली. संक्रमण शिबिराअंतर्गत बांधण्यात आलेल्या एकूण १४ अनधिकृत खोल्या जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आल्या.