शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

येऊरच्या अनाधिकृत हॉटेलवर ओढवणार संक्रात

By अजित मांडके | Published: April 13, 2023 4:06 PM

अनाधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची पालिकेकडून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : येऊरमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल्सचा मुद्दा ऐरणीवर असताना ही सर्व हॉटेल्स गुरुवारपासून बंद करा हे सांगण्यासाठी वर्तकनगर प्रभाग समितीमधील अधिकारी आणि कर्मचारी येऊर परिसरात बुधवारी फिरले होते. त्यानंतर गुरुवारी मुंबईत सहयाद्री अतिथीगृहावर येऊर संदर्भात महत्वाची बैठक पार पडली. परंतु ही बैठक सुरु असतांनाच ठाणे महापालिकेने येऊर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अनाधिकृत हॉटेल्सचे पाणी बंद करण्यासाठी पुन्हा येथील हॉटेलची पाहणी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कनेक्शन अनाधिकृत असेल तर कापण्याचे आदेशही पालिकेने दिले आहेत.

येऊर मधील हॉटेल्स आणि अनधिकृतपणे बांधण्यात आलेले बंगले हे सध्या चचेर्चा विषय ठरले आहेत. येऊर येथील दिवसरात्र सुरु असलेल्या हॉटेल आणि वाढत्या ध्वनी प्रदुषणाच्या विरोधात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर स्थानिक आदिवासींनी देखील याविरोधात आवाज उठविला आहे. येथे रात्रभर सुरू असलेल्या पार्ट्या, डीजेचा आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट टर्फ, दारू व अम्ली पदार्थ विकणे, कचरा जंगलात टाकणे, अनाधिकृत पार्किंगमुळे येऊरचे अस्तित्व  धोक्यात आल्याचे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे येऊर जंगल वाचवा मोहीम त्यांनी आता हाती घेतली आहे.  या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी येऊर आदिवासी वनहक्क समितीच्या वतीने केली होती.  

याच पार्श्वभुमीवर गुरुवारी वनमंत्री सुधीर मुनगुट्टीवार यांच्या उपस्थितीत मुंबईत एक बैठक झाली. या बैठकीला राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, पालिकेचे अधिकारी, पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानुसार रात्री ११ नंतर येऊर येथील प्रवेश द्वार बंद करण्यात यावे, मोठ्या रोषणाईच्या विद्युत लाईट बंद कराव्यात, वेळप्रसंगी टर्फ उखडून टाकावेत, ध्वनी प्रदुषण होणार नाही, या दृष्टीकोणातून काळजी घ्यावी. त्याअनुषंगाने रात्री १० नंतर लग्न किंवा इतर समांरभ होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. इको सेन्सीटीव्ह झोन असल्याने प्रखर प्रकाश ज्योत आणि रात्रीच्या आवाज बंद करण्यासाठी पावले उचलावीत, पोलिसांनी अनाधिकृत हॉटेलच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशा आशयाचे महत्वाचे आदेश या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

परंतु ही बैठक सुरु असतांनाच दुसरीकडे महापालिकेने देखील एक आदेश काढून येथील अनाधिकृत नव्याने उभारलेल्या हॉटेल व बांधकामांना देण्यात आलेले पाणी कनेक्शन अधिकृत आहे किंवा नाही, याची माहिती घेतली जावी. तसेच कनेक्शन अनाधिकृत आढळल्यास ते तत्काळ खंडीत करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका