ठाणे : रेल्वेतून प्रवास करताना विनाबुकिंग लगेज नेणाºया चार हजार ६१० प्रवाशांवर ठाणे रेल्वेस्थानकात मागील सात महिन्यांत कारवाई करण्यात आली. या दंडात्मक कारवाईमुळे रेल्वेच्या तिजोरीत जवळपास साडेपाच लाखांचा महसूल जमा झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
विनातिकीट असो वा विनाबुकिंग लगेज नेणारे प्रवासी असोत, रेल्वे फलाटावर रेल्वेच्या तिकीट तपासनिसांद्वारे त्यांच्यावर कारवाई केली जाते. त्यानुसार, ठाणे रेल्वेस्थानकात एकू ण २६ तिकीट तपासनीस आहेत. ठाणे रेल्वेस्थानकातून मध्य रेल्वे, ट्रान्स-हार्बर आणि एक्स्प्रेस व मालगाड्यांची वाहतूक सुरू असते. सेकंड क्लासच्या सीजन तिकिटावर १० किलो, प्रथम श्रेणीच्या तिकिटावर १५ किलो, त्याचबरोबर यात्रा तिकिटाच्या द्वितीय श्रेणीवर ३५ आणि प्रथम श्रेणीच्या तिकिटावर ५० किलो वजन नि:शुल्क नेण्याची परवानगी आहे.
दररोज रेल्वेस्थानकातून सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात. त्यामुळे हे रेल्वेस्थानक नेहमी गजबजलेले असते. या गजबजलेल्या ठिकाणी विनातिकीट अथवा विनाबुकिंग लगेज नेणे सहज शक्य असल्याचा विचार काहंी प्रवासी करतात. यातून ठाणे रेल्वेस्थानकात सात महिन्यांत विनाबुकिंग लगेज नेणाºया चार हजार ६१० जणांना पकडले आहे. यामध्ये सर्वाधिक ९१३ केसेस एप्रिल महिन्यात, तर सर्वात कमी १३ केसेस फेब्रुवारी महिन्यात झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
या कारवाईतून रेल्वेच्या उत्पन्नात पाच लाख ३८ हजार १५० रुपयांची वाढ झाली आहे. सर्वाधिक एक लाख ३८ हजार ५६५ रुपये दंडाची रक्कम वसूल केली गेल्याचेही रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले.