ठाणे : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणा-या रिक्षांवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत नियमित कारवाई सुरू आहे. मागील सहा महिन्यांत केलेल्या कारवाईत १,२४४ रिक्षाचालक दोषी आढळून आले. यामध्ये चार प्रवासी नेणा-या ४०५ रिक्षांचा समावेश आहे. मात्र, ठाण्यात या कारवाईत एकही जलद मीटर असलेली रिक्षा सापडलेली नाही. या कारवाईमध्ये सुमारे ३२ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.जादा भाडे, प्रवासी, जलद मीटर, भाडे नाकारणे, उद्धट वागणे आदी प्रकारच्या तक्रारी रिक्षाचालकांविरुद्ध ठाणे आरटीओ कार्यालयात नेहमी प्राप्त होत असतात. त्यानुसार, ही कारवाई केली जाते. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत आरटीओ अधिका-यांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १३ हजार ३३८ रिक्षांची तपासणी केली. त्यामध्ये १२४४ रिक्षा दोषी आढळून आल्या. त्यातील ९८७ रिक्षांची प्रकरणे निकाली काढली. परवाना निलंबनाची कारवाई २०८ रिक्षांवर केली आहे. याचदरम्यान, या कारवाईत तडजोडशुल्क म्हणून २३ लाख ३५ हजार ४२५ रुपये वसूल केले. तसेच आठ लाख ४० हजार न्यायालयीन दंड आकारण्यात आला. या कारवाईत १३७ जादा भाडे आकारणाºया रिक्षांवर केसेस करण्यात आल्या आहेत. तर, चार प्रवासी नेणे ४०५, भाडे नाकारणे ४६, उद्धट वर्तन ३६ आणि इतर ६३० अशा एकूण १२४४ केसेस केल्याची माहिती आरटीओ सूत्रांनी दिली.सप्टेंबर महिन्यात २५२ रिक्षा दोषी आढळून आल्या आहेत. त्यामध्ये चार प्रवासी नेण्याच्या ७६ केसेस नोंदवल्या आहेत. जादा भाडे आकारणा-या ४७, भाडे नाकारणे २, उद्धट वागणे ३ आणि इतर १२४ अशा केसेस केल्या आहेत. केसेस करताना २३४२ रिक्षा तपासण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.........................................