- संतोष भोसले, केशकर्तनालय मालक, भाईंदर
बाहेर फेरीवाले , बाजार व खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर लोकांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग पसरणार नाही का ? केवळ हॉटेलमधूनच कोरोना पसरतो का ? आम्ही ५० टक्के हॉटेल चालविण्याच्या नियमांचे पालन करत आलो आहोत. हॉटेल चालविणे हे अतिशय खर्चिक असून लॉकडाऊनमुळे आधीच आमचा व्यवसाय डबघाईला आला आहे. हॉटेलचालक प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे हॉटेल, बार बंद न करता त्यांना नियमांचे पालन करून व्यवसाय करू द्या. सरकारने आमचे कोणतेही शुल्क माफ केलेले नाही. कोणताच दिलासा दिलेला नाही. मग व्यवसायावर संक्रांत आणू नये.
- उदय शेट्टी, हॉटेल-बारमालक, मीरारोड
कोरोनाचे रुग्ण व त्याने होणाऱ्या मृत्यूंची संख्या ज्या वेगाने वाढत आहे ती स्थिती गंभीर आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. परंतु गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे जीम चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे सरकारने निकष, अटी ठरवून कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याची खबरदारी बाळगून जीमचालकांना निदान सोमवार ते शुक्रवार परवानगी दिली पाहिजे होती. त्याचबरोबर संसर्ग वाढवण्यास जे बेजबाबदार लोक कारणीभूत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. जेणेकरून खऱ्या अर्थाने संसर्ग फैलावण्यास जबाबदार असणाऱ्यांना वचक बसेल.
- शैलेश गोयल, जीमचालक, भाईंदर