शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
3
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
4
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
5
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
6
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
8
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
9
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
11
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
12
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
13
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
14
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
15
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
16
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
17
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
18
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
19
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
20
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

सोसायट्यांवर कारवाई

By admin | Published: September 25, 2016 4:26 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आॅगस्ट २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ४६१ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ८५० नवीन मतदार याप्रमाणे एकूण ३ लाख ३८ हजार नवे मतदार

मीरा रोड: मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आॅगस्ट २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी ४६१ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ८५० नवीन मतदार याप्रमाणे एकूण ३ लाख ३८ हजार नवे मतदार नोंदवण्याचे आदेश आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दिले आहेत. ज्या गृहनिर्माण संस्था मतदारनोंदणीकरिता कर्मचाऱ्यांना प्रवेश देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेशही आयुक्तांनी दिलेमतदारनोंदणीची मोहीम सुरू असून शहरातील ९ लाख ६० हजार लोकसंख्येच्या तुलनेत मतदार केवळ ४ लाख ७८ हजारच नोंदले गेले आहेत. त्यामुळे १४ आॅक्टोबरपर्यंतच्या मतदारनोंदणी मोहिमेत आणखी नवे मतदार नोंदवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबरदरम्यान नवीन मतदारनोंदणी करून मतदारयाद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक भार्इंदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगर भवन) येथील सभागृहात शुक्रवारी झाली. आयुक्त डॉ. नरेश गीते, तहसीलदार विनोद गोसावी, नायब तहसीलदार यादव, पंडित, उपायुक्त मुख्यालय विजयकुमार म्हसाळ, सचिव हरीश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांकडून अडीअडचणी जाणून घेतल्या. दिलेल्या अर्जांची पोच न देणे, एका यादीतील नावे दुसऱ्याच यादीत टाकणे, गृहनिर्माण संस्था व रहिवाशांकडून कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारला जाणे, यापूर्वी अनेकवेळा अर्ज भरून फोटो व पुरावे देऊनही मतदारयादीत नाव न आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होणे आदी अडचणी कर्मचाऱ्यांनी मांडल्या. ज्या गृहनिर्माण संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.ओवळा-माजिवडा मतदारसंघातील अर्ज देण्यास माजिवडा येथे जावे लागत असल्याने मीरा-भार्इंदरमध्येच कार्यालय सुरू केल्यास नागरिक व कर्मचाऱ्यांची गैरसोय टळेल, असा सूर यावेळी व्यक्त झाला. पालिकेच्या माहितीनुसार २०११च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ८ लाख ९ हजार होती. त्यात २० टक्के वाढ गृहीत धरता आजघडीला ती सुमारे ९ लाख ६० हजार इतकी आहे. सध्याच्या लोकसंख्येतील १७ वर्षांपर्यंतच्या मुलांना वगळले तर ८ लाख १६ हजार मतदार नोंदले जायला हवेत. (प्रतिनिधी)प्रत्येक कर्मचाऱ्यास ८५० मतदारांचे टार्गेटमीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ क्र. १४५ मध्ये ३ लाख ५६ हजार मतदार, तर ओवळा-माजिवडा-क्र. १४६ मतदारसंघांतल्या पालिका हद्दीत १ लाख २२ हजार इतके मतदार आहे. दोन्ही विधानसभा मतदारसंघांत मिळून एकूण ४ लाख ७८ हजार मतदार आहेत. म्हणजे, आणखी ३ लाख ३८ हजार नवीन मतदार नोंदवायला हवेत. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला ८५० मतदारांचे उद्दिष्ट आयुक्तांनी ठरवून दिले. घरोघरी जाऊन मतदारनोंदणी व यादी अद्ययावतसाठी मीरा-भार्इंदर मतदारसंघात १७२ कर्मचारी व १२१ शिक्षक असे मिळून २९३ कर्मचारी, तर ओवळा-माजिवडा मतदारसंघात ७३ पालिका कर्मचारी व ९५ शिक्षक मिळून १६८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु, शिक्षकांनी सुरुवातीला काम करण्यास नकार दिल्याने मतदारयादीचे काम रेंगाळले होते. आजच्या बैठकीस शिक्षकांनी हजेरी लावून कामास सुरुवात केली आहे. पालिका शाळांमध्ये तसेच आॅनलाइनदेखील मतदारनोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.