शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दुकानांवर सायंकाळी ७ नंतर कारवाई सुरू; दुकाने रात्री १०पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2020 9:34 PM

तर मास्क न लावणारे, गर्दी करणारे ह्यांच्यावर कारवाई करा. पण दुकानांची वेळ आता रात्री १० वाजेपर्यंत करून द्या, अशी मागणी केली जात आहे. 

मीरा रोड - मीरा भाईंदरमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकानांना सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी असल्याने त्यानंतर दुकाने सुरू दिसताच पालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तर मास्क न लावणारे, गर्दी करणारे ह्यांच्यावर कारवाई करा. पण दुकानांची वेळ आता रात्री १० वाजेपर्यंत करून द्या, अशी मागणी केली जात आहे. मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा कहर कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. २ ऑक्टोबरपर्यंत मीरा भाईंदरमध्ये कोरोनामुळे ५८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १८ हजार ८७० इतके कोरोनाचे रुग्ण झाले असून, त्या पैकी १६ हजार ३०४ रुग्ण बरे झाले आहेत. १ हजार ९८६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

एकीकडे अनलॉकमुळे शहरातील व्यवहार सुरू झालेले असल्याने लोकांची गर्दी वाढत आहे. त्यातच मास्क घालायचा नाही वा अर्धवट दिखाव्याला घालायचा, गर्दी करून सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन सर्रास सुरू आहे. जेणेकरून कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यातच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने ही सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास महापालिका आयुक्त डॉ . विजय राठोड ह्यांनी परवानगी दिली होती. दुकानदारांनी तसेच ग्राहकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे बंधनकारक करत उल्लंघन केल्यास दंड आकारणीचा इशारा दिला होता . 

परंतु शहरात सायंकाळी ७ नंतरदेखील अनेक जण दुकाने उघडी ठेवत आहेत. काही जण अर्धे शटर उघडे ठेवून व्यवसाय करत. जेणेकरून सायंकाळी ७ नंतर देखील गर्दी होत असल्याने अखेर पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या शोरूमसह दुकानदारांवर २ हजार रुपये दंड आकारण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. दुकानदार वाद घालतात म्हणून सोबत पोलीस कर्मचारीदेखील असतात. तर दुकानांची वेळ आता सायंकाळी ७ ऐवजी रात्री १० पर्यंत वाढवून द्या, अशी मागणी भाजपा नगरसेवक एड रवी व्याससह दुकानदारांनी चालवली आहे. कोरोनामुळे व्यवसाय ठप्प असून वेळ वाढवून दिल्यास दिलासा मिळेल असे व्यास म्हणाले. मास्क न लावणारे, गर्दी करणारे ह्यांच्यावर कोरोना संसर्ग पसरू नये म्हणून जरूर कठोर कारवाई करा, पण दुकानाची वेळ वाढवून द्या अशी मागणी होत आहे.