शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

ठाण्यातील ४५८ हॉटेल, पबवर उद्यापासून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 2:51 AM

मुंबईतील कमला मिल दुर्घटनेनंतर ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून शनिवारी झालेल्या महासभेत भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसने प्रशासनाला धारेवर धरल्यावर ज्या हॉटेल, पबनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केली.

ठाणे : मुंबईतील कमला मिल दुर्घटनेनंतर ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून शनिवारी झालेल्या महासभेत भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसने प्रशासनाला धारेवर धरल्यावर ज्या हॉटेल, पबनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केली नसेल त्यांच्यावर सोमवारपासून कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. शहरातील ४५८ हॉटेल, पब, बारवाल्यांना ९० दिवसांच्या मुदतीत अग्निशमन विभागाचे परवाने मिळवता न आल्याने त्या सर्वांवर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. परंतु ही कारवाई कोणत्या स्वरुपाची असेल याचा उल्लेख मात्र त्यांनी केलेला नाही.कारवाई करतांना कायद्याच्या बाजू पडताळूनच करणे योग्य ठरेल, अन्यथा भविष्यात आपणच अडचणीत येऊ. त्यामुळे त्याची खबरदारी घेतली जाईल, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. कमला मिल दुर्घटनेनंतर ठाण्यातील हॉटेल, बार अशा ४५८ आस्थापनांना अग्निशमन दलाने नोटिसा बजावल्या. त्यामुळे एनओसीसाठी धावपळ सुरु झाली.प्रश्नोत्तराच्या तासाला भाजपाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी कोठारी कंपाऊंडचा मुद्दा उपस्थित केला. तेथील हॉटेल, बार आणि पबवरील कारवाईचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. या सर्व आस्थापनांना अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे का, असे त्यांनी विचारले. यावर अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवले असल्याचे स्पष्ट केले.येथील सर्व आस्थापनांना सप्टेंबर महिन्यात ९० दिवसांत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. ती मुदत संपली, त्यांनंतर हॉटेल मालकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुदतवाढ मागितली होती. त्यांना २० जानेवारीपर्यंतची मुदत दिल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली.कारवाई करताना तांत्रिक बाबी तपासून पाहणारमुंबईत कमला मिलसारखी दुर्घटना घडल्यांनंतरही आपण ठाण्यात कारवाई का केली नाही. यापूर्वी कोठारी कंपाऊडमध्ये आगीच्या १३ दुर्घटना घडल्या आहेत. मग तुम्ही कसली प्रतीक्षा करत आहात, असा सवाल नारायण पवार, सुनेश जोशी, भरत चव्हाण, मिलिंद पाटणकर, कृष्णा पाटील यांनी केला.आयुक्त जयस्वाल म्हणाले की, हा अत्यंत संवेदनशील विषय असून आम्ही यापूर्वी भरपूर हॉटेलवर कारवाई केली आहे. आम्ही या सर्व हॉटेलमालकांना कागदपत्रे सादर करण्यासाठी आजपर्यंतची मुदत दिली होती.या मुदतीत त्यांनी योग्य कागदपत्रे सादर न केल्यास सोमवारपासून आम्ही हॉटेल सील करू. परंतु कारवाई करताना काही तांत्रिक बाबी पडताळून पाहणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात कारवाई केल्यानंतर भविष्यात आपणच अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :thaneठाणे