हितेन नाईक ।पालघर : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या पदोन्नती, घोटाळ्याची व भ्रष्टाचाराच्या आरोपांची सहकारमंत्र्यानी चौकशी करून उचित कारवाई करावी असे निर्देश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी दिले आहेत. तर याच भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी विकासमंचाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांनी कर्मचारी पदोन्नती मध्ये मोठा भ्रष्टाचार केला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार डहाणूचे आमदार पास्कल धनारे ह्यांच्यासह खासदार चिंतामण वनगा, यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, उपनिबंधक, ठाणे ह्यांच्या कडे केली आहे. ह्या संदर्भात जिल्हा उपनिबंधक ठाणे ह्यानी उचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथम सहकारमंत्री सुभाष देशमुख ह्यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. मात्र या टीडीसी बँकेत मोठा गैरव्यवहार होत असून अनियमितताही दिसून येत असल्याने त्याचा मोठा फटका स्थानिक सुशिक्षित तरुण, मच्छिमार, शेतकरी व बँकेचे पात्र कर्मचारी यांना बसणार असल्याने खुद्द मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आमदार धनारे यांच्या तक्रारीबाबत सहकार मंत्र्यांनाच उचित कार्यवाही करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.जून मध्ये ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा गैरव्यवहार झाला असून संचालक मंडळ व व्यवस्थापकांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून स्वत:च्या नातेवाईक कर्मचाºयांना पदोन्नती दिल्याची अनेक प्रकरणे नावांसाहित जिजाऊ शैक्षणकि संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी जाहीर केली आहेत.कोणतीही सेवा ज्येष्ठता व शैक्षणिक पात्रता नसतांना व संपूर्ण बँक हि संगणक प्रणालीनुसार सुरु असतांना पदोन्नतीसाठी मात्र कुठल्याही संगणक प्रणालीचा वापर करण्यात आला नसल्याची बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.संचालकांचे नातेवाईक हे १२ वी पर्यंत शिक्षित असतांनाही त्यांच्यावर बँकेने पदोन्नत्यांचा सातत्याने वर्षाव केला आहे. तसेच व्यवस्थापक व संचालक मंडळाच्या व काही लोकप्रतिनिधींच्या अशा सुमारे ३४ नातेवाईक कर्मचाºयांनाच गेल्या १५ वर्षात सातत्याने पदोन्नती मिळाल्याची गंभीर तक्र ार आहे. त्यामुळे गरीब व प्रामाणिक काम करणाºया कर्मचाºयांना पदोन्नती पासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या बेकायदेशीर पदोन्नत्या तात्काळ रद्द कराव्यात तसेच निकष डावलून देण्यात आलेल्या ११७ कर्मचाºयांच्या पदोन्नत्या रद्द करण्याचे आदेश संबंधितांना द्यावे अशी मागणी आ.धनारे, खासदार वनगा यांनी केली होती.
टीडीसीवर कारवाई - मुख्यमंत्री,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:00 AM