जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवकठाणे: होळी आणि धुळवडीनिमित्त ठाण्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धुळवडीच्या नावाखाली विनाकारण तरुणींवर किंवा अल्पवयीन मुलींवर पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या फेकणायांवर कडक कारवाई केली जाणार आहे. शिवाय, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.होळी आणि धूलिवंदन या सणासाठी शालेय विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत मोठ्या प्रमाणात तयारी केली जात आहे. यासाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा अवलंब करण्याचे पर्यावरणपे्रमींकडून तसेच सामाजिक संस्थांकडून आवाहन केले जात आहे. दुसरीकडे होळी आणि धुळवडीच्या आधीच काही मुले अनोळखी मुला-मुलींच्या दिशेने पाण्याने किंवा रंगाने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या भिरकावत आहेत. यातूनच छेडछाडीचे तसेच संबंधित मुले किंवा मुली जखमी होण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे रंगाच्या पिशव्या भिरकावणाºयांविरुद्ध तक्रार आल्यास ती गांभीर्याने घेतली जाणार असल्याची माहिती ठाण्याच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. काही रस्ता सख्याहरींकडूनही मद्य प्राशन करीत होळीच्या दुसºया दिवशी अर्थात धूलिवंदनाच्या दिवशी धिंगाणा घातला जातो, त्यामुळे अशा छेडछाड करणाºयांविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांचे दामिनी पथक तत्काळ कारवाई करणार आहे. पोलीस नियंत्रण कक्षाकडे १०० किंवा १०३ क्रमांकावर तक्रार आल्यानंतर हे दामिनी पथक त्या-त्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कारवाई करणार आहे.याव्यतिरिक्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये पोलीस मुख्यालयाचे ७०० कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या (५०० कर्मचारी) आणि स्थानिक तीन हजार कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोरोना व्हायरसमुळे आवश्यकता असेल तरच बाहेर पडा, गर्दी करणे टाळा, असे आवाहन केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
होळी-धुळवडीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाण्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. धिंगाणा घालणारे, प्लास्टिकच्या पिशव्या फेकणाºयांवर दामिनी पथकाची करडी नजर राहणार आहे. तसेच ‘कोरोना’ व्हायरसमुळे शक्यतो नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहनही केले आहे.- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर