कल्याण : गणेशोत्सवासाठी केडीएमसीने गुरुवारपर्यंत १९२ सार्वजनिक मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी दिली आहे. तर, अन्य २४ मंडळांच्या परवानगीबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाºया मंडळांवर कारवाई करण्यासाठी स्थापन केलेली प्रभागनिहाय विशेष पथके शनिवारपासून सर्वेक्षण करणार आहेत. त्यामुळे नियमबाह्य आणि बेकायदा मंडप उभारणाºयांचे धाबे दणाणले आहेत.केडीएमसी हद्दीत साधारण ९०० च्या आसपास मंडळे आहेत. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज आणि कमानी उभारण्यासाठी मंडळांनी केडीएमसीकडे अर्ज केले आहेत. महापालिकेने २५ आॅगस्टपासून त्यांना परवानगी देण्यास सुरुवात केली. परवानगीसाठी महापालिकेसह वाहतूक शाखा, पोलीस आणि अग्निशमन दलाचा नाहरकत दाखला आवश्यक होता. मात्र, परवानग्या मिळण्यासाठी लागणारा विलंब पाहता गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही केडीएमसीने एक खिडकी योजना राबवली. महापालिका क्षेत्रातील आठ पोलीस ठाण्यांमध्ये ही खिडकी उघडण्यात आली.परवानगीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ सप्टेंबर होती. परंतु, गोपाळकाल्यानंतर खºया अर्थाने गणेशोत्सवाच्या तयारीला वेग येत असल्याने कालावधी अत्यल्प असल्याकडे गणेश मंडळांनी लक्ष वेधले होते. त्यामुळे गोपाळकाला उत्सवानंतर आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी अधिक मिळावा, अशी मागणी मंडळांनी केली होती. त्यामुळे ही मुदत तीन दिवसांनी म्हणजेच ६ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. अखेर, मुदतीअंती २१६ मंडळांनी मंडपासाठी अर्ज केले. त्यातील १९२ मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली. उर्वरित २४ मंडळांनी परवानगीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू असल्याची माहिती बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाने दिली. यंदाच्या वर्षी मंडपाबरोबर कमानीसाठीही परवानगी घेणे बंधनकारक आहे.>खोदकाम जोमातमंडपासाठी रस्ता खोदल्यास १० हजारांचा दंड वसूल करण्याचा निर्णय केडीएमसीने घेतला आहे. परंतु, डोंबिवली पश्चिमेत काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्याचबरोबर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, असेही मंडप थाटले आहेत. त्यावर विशेष पथके काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.>आगमन खड्ड्यांतूनचगणेशोत्सवाच्या धर्तीवर शहरात रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. डांबरीकरणाचीही कामे सुरू आहेत. परंतु, काही मंडपांच्या समोरच खड्डे आहेत. त्यामुळे बाप्पांचे आगमन खड्ड्यांतूनच होण्याची दाट शक्यता आहे. रविवारपासूनच सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे आगमन होणार आहे. त्यामुळे तातडीने खड्डे भरावेत, अशी मागणी होत आहे.>मंडळांची संख्या रोडावलीकल्याण-डोंबिवली शहरात गेल्या वर्षी ३६९ मंडळांनी परवानग्या घेतल्या होत्या. परंतु, यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या रोडावली आहे.खाजगी जागेत, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मंडप अथवा कमानी उभारण्यासाठी यंदा परवानगीची आवश्यकता नसल्याने मंडपांची संख्या घटल्याचे बोलले जात आहे.
नियम डावलणाऱ्या मंडळांवर आजपासून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 2:40 AM