शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
5
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
6
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
7
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
8
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
9
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
10
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
11
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
12
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
13
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
14
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
15
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
16
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
17
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
18
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
19
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
20
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक

अवघ्या २४ तासांमध्ये ४८ तळीरामांविरुद्ध वाहतूक शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 20:25 IST

बहुसंख्य रस्ते अपघात हे मद्यपी वाहन चालकांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अशा वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते. होळी आणि धुळवडीचा सण साजरा करण्याच्या नावाखाली अनेकजण मद्य प्राशन करुन वाहन चालवितात. याच पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार मद्यपी वाहनचालक आणि कलम १८८ अन्वये सहप्रवाशांवरही कारवाई केली जाते.

ठळक मुद्दे एक हजार १८२ विना हेल्मेट चालकांवर बडगाअंबरनाथ विभागाअंतर्गत सर्वाधिक १३ मद्यपी वाहन चालकासह १६ सहप्रवाशांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ४८ तळीरामांविरुद्ध तसेच ३१ सहप्रवाशांवरही ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई केली आहे. त्याचबरोबर एक हजार १८२ विना हेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्यांवरही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.बहुसंख्य रस्ते अपघात हे मद्यपी वाहन चालकांमुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अशा वाहनचालकांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जाते. होळी आणि धुळवडीचा सण साजरा करण्याच्या नावाखाली अनेकजण मद्य प्राशन करुन वाहन चालवितात. याच पार्श्वभूमीवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार मद्यपी वाहनचालक आणि कलम १८८ अन्वये सहप्रवाशांवरही कारवाई केली जाते. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या १८ विभागांतर्गत २८ मार्च रोजी रात्री आणि २९ मार्च रोजी दिवसभर विविध ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्यात २८ मार्च रोजी दोन तर २९ मार्च रोजी ४६ अशा ४८ मद्यपी वाहन चालकांना पकडण्यात आले. त्याचवेळी सोमवारी मद्यपींसमवेत वाहनांमध्ये असलेल्या ३१ सह प्रवाशांवरही कारवाई झाली. यामध्ये अंबरनाथ विभागाअंतर्गत सर्वाधिक १३ मद्यपी वाहन चालकासह १६ सहप्रवाशांवर कारवाई झाली आहे. रविवारी विनाहेल्मेट वाहन चालविणारे २७७ आणि सोमवारी ९०५ अशा एक हजार १८२ जणांवर कारवाई करण्यात आली. तर मोटारसायकलीवरुन ट्रीपल सीट जाणाºया ९८ जणांविरुद्ध कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. विशेष म्हणजे या कारवाई सोबतच कर्कश आवाजात मोटारसायकली वाहन चालविणाºयांवरही कारवाईचा बडगा उगारल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस