शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांच्या अनधिकृत तीन मजली इमारतीवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 8:36 PM

मीरा-भार्इंदर महापालिकेला सत्ताधा-यांनी दिलेल्या असहाकाराच्या इशा-यामुळे प्रशासनाने सोमवारी मीरागाव येथील शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांच्या तीन मजली अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई केली.

- राजू काळे 

भाईंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेला सत्ताधा-यांनी दिलेल्या असहाकाराच्या इशा-यामुळे प्रशासनाने सोमवारी मीरागाव येथील शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांच्या तीन मजली अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई केली. मात्र ही कारावाई सत्ताधा-यांच्या दबावाखाली केली जात असल्याचा आरोप कमलेश यांनी केला आहे.

शहरातील अनधिकृत बांधकाम भ्रष्ट प्रशासकीय अधिका-यांमुळे वाढत असून त्याविरोधात सत्ताधारी भाजपा नगरसेवक तक्रारी करुनही प्रशासन कारवाई करीत नसल्याने संतप्त झालेल्या महापौर डिंपल मेहता यांनी आयुक्त डॉ. नरेश गीते यांना असहकाराचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर १७ नोव्हेंबरपासून तोडक कारवाई सुरु केली. मात्र ही कारवाई प्रशासन सत्ताधा-यांच्या दबावाखाली सरसकट न करता केवळ विरोधी पक्षाच्या निकटवर्तीयांच्या बांधकामांवर करीत असल्याचा आरोप सेना व काँग्रेस या विरोधी पक्षांकडुन करण्यात येत आहे. २३ नोव्हेंबरला काँग्रेसचे स्थानिक  नेतृत्व मुझफ्फर हुसेन यांचे बंधू मुनावर हुसेन यांच्या १० मजली बांधकामावर तोडक कारवाई करुन त्यांच्यावर एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर मीरागाव येथील कृष्णस्थळ परिसरात असलेल्या यशवंत भवन या तीन मजली इमारतीवर बुलडोजर फिरविण्यात आला. ही इमारत शिवसेना नगरसेवक कमलेश भोईर यांची असल्याचा दावा प्रशासनाकडुन करण्यात येत आहे. मात्र या कारवाईतुन भाजपातीलच अनधिकृत बांधकाम माफीयांना वगळल्याचा आरोप केला जात असून त्यात अलिकडेच हाटकेश परिसरात उद्यानाचे आरक्षण असलेल्या जागेवर बारचे बेकायदेशीर बांधकाम सुरु असल्याचे सेनेचे शाखाप्रमुख महेश शिंदे यांनी उघडकीस आणले. हे बांधकाम करणारी व्यक्ती भाजपाची समर्थक असल्यानेच त्याविरोधात अनेकदा तक्रारी करुनही ते अद्याप तोडण्यात आले नसल्याचा दावा केला जात आहे. यावरुन तोडक कारवाईतून वाचलेले सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधीच खरे लाभार्थी ठरत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येऊ लागली आहे. 

तोडण्यात आलेली तीन मजली इमारत वडील यशवंत यांची असुन त्याचा आपल्याशी कोणताही संबंध नाही. प्रशासनाने विरोधी पक्षांच्या बांधकामांवर सुरु केलेली एकतर्फी कारवाई स्थानिक भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष मुकेश मेहता यांच्या १० मजली अनधिकृत इमारतीसह स्थानिक नगरसेविका वीणा भोईर यांच्या बेकायदेशीर बंगल्यावर देखील कारवाई होणे अपेक्षित आहे. 

- कमलेश भोईर, शिवसेना नगरसेवक

या इमारतीची जागा स्व. यशवंत भोईर यांच्या मालकीची असुन त्यावर त्यांनी बांधलेल्या सत्यम, शिवम इमारतीतील रहिवाशांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या सुविधा भुखंडावर ती बेकायदेशीर तीन मजली इमारत बांधण्यात आली होती. तीचे बांधकाम यशवंत भोईर यांच्या निधनानंतर सुरु करण्यात आल्याने त्यांचा बांधकामाशी कोणताही संबंध नसल्याची तक्रार पालिकेकडे अगोदरच केलेली आहे. 

-   गजानन नागे, अध्यक्ष,  भाजपाचे सृष्टी मंडळ

पालिकेची रितसर परवानगी घेऊनच बंगला बांधला असुन कमलेश यांनी केलेला आरोप खोटा आहे. त्यांचेच शहरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे असुन ती वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. कोणावरही खोटे आरोप करु नयेत. 

- वीणा भोईर, भाजपा, नगरसेविका 

त्या इमारतीवरील कारवाईपुर्वी प्रशासनाने कमलेश यांच्याच नावे नोटीस पाठविली होती. त्यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नसल्यानेच ती अवैध ठरली. कमलेश यांनी केलेल्या आरोपानुसार माझी कोणतीही १० मजली इमारत नाही. तसे त्यांनी सिद्ध करुन पालिकेकडे कारवाईसाठी तक्रार करावी. त्या इमारतीवर झालेल्या कारवाईमुळेच कमलेश खोटे आरोप करीत सुटले आहेत. 

-  मुकेश मेहता, भाजपा उपजिल्हाध्यक्ष,  मीरा-भार्इंदर

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर