ठाणे : रेल्वेस्थानकातून उतरणाऱ्या प्रवाशांना अवाजवी भाडे सांगून पैसे उकळणा-या रिक्षाचालकांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई करताना, चक्क पोलीसच प्रवासी बनले होते. बुधवारी सकाळी अडीच तास चाललेल्या कारवाईत ११ रिक्षाचालक पोलिसांच्या जाळ्यात अडकले. तसेच रिक्षाने जाणाºया प्रवाशांनी स्टॅण्डमधून रिक्षा पकडूनच प्रवास करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.सॅटीस पुलाखालील रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा जगजाहीर आहे. त्यातच, काही रिक्षाचालकांचे टोळके स्टॅण्डच्या लायनीत रिक्षा उभी करून प्रवासी न घेता, रिक्षा स्टॅण्डपुढे आणून रस्त्यात उभी करतात. रेल्वेस्थानकातून मोठमोठ्या बॅग घेऊन येणाºया प्रवाशांकडून, लांबच्या प्रवासासाठी अवाजवी भाडे आकारतात. यासाठी रेल्वेस्थानकाच्या गेटवर प्रवासी मिळवण्यासाठी त्या रिक्षाचालकांची जणू चढाओढ सुरू असते. त्यामुळे नाहक येथून येजा करणाºया प्रवाशांना त्रास होतो. याबाबत तक्रारी वाढल्याने शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी अचानक कारवाईला सुरुवात केली. यावेळी ८ ते १० पोलीस कर्मचारी हे साध्या वेशात प्रवासी म्हणून दोघेतिघे असे रेल्वे स्थानकातून बाहेर पडत होते. तसेच जादा पैसे उकळणाºया आणि रस्ता अडवणाºया ११ रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. अडीच तास चालणाºया कारवाईत त्या रिक्षाचालकांकडून हजारो रुपयांचा दंड महाराष्टÑ मोटार वाहन नियमानुसार आकारला गेला आहे. ही कारवाई ठाणेनगर पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अपर्णा व्हटकर आणि १२ कर्मचाºयांनी केली.>‘‘शहरातील ही पहिलीच कारवाई आहे. दिवसेंदिवस रिक्षाचालकांविरोधात तक्रारी वाढल्या होत्या. तसेच त्यांच्या बेशिस्तपणाला आळा बसवण्यासाठी ही कारवाई अशीच यापुढे सुरू राहणार आहे. नागरिकांनीही दिलेल्या थांब्यांवरच रिक्षा पकडून प्रवास करावा.’’- हेमलता शेरेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर वाहतूक उपशाखा
बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 3:03 AM