लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहिम सुरू केली आहे. असून त्या अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाºया५४४ वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारी पहिल्याच दिवशी कारवाई केली. यात जादा प्रवासी नेणारे रिक्षा चालक, ट्रिपल सीट प्रवास करणारे दुचाकीस्वार आदींचा यामध्ये समावेश आहे. यापुढे कारवाई टाळण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.राज्यभरात कोरोना रु ग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. ती रोखण्यासाठी सरकारने ५ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू केले आहेत. रिक्षामध्ये चालक अधिक दोन प्रवासी तसेच टॅक्सी किंवा अन्य चारचाकी वाहनांमध्ये वाहनांमध्ये क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांनाच प्रवासाची मुभा आहे. सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करणाºया व्यक्तीस मास्कचा वापर अनिवार्य आहे. या वाहतूक व्यवस्थेतील चालक आणि अन्य कर्मचाऱ्यांचा प्रवाशांशी संपर्क येतो. त्यामुळे त्यांनी तातडीने लसीकरण करण्याच्याही सूचना आहेत. तसेच, १० एप्रिलनंतर त्यांना कोरोना निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट बाळगणे क्र मप्राप्त आहे. दर १५ दिवसांनी अशा आरटीपीसीआर चाचण्या करून त्याचे प्रमाणपत्रही त्यांना बाळगावे लागणार आहे. ते नसल्यास रिक्षा आणि टॅक्सीत वाहनचालक आणि प्रवासी बसण्याच्या जागेत पार्टीशन करावे लागणार आहे. सरकारच्या आदेशानंतर ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही त्याआधारे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात हे निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतरही त्याचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.सोमवारी राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मोटारसायकलीवरुन ट्रिपल सीट जाणारे २० वाहनचालक, रिक्षात चालकाच्या शेजारे प्रवासी वाहतूक करणारे १६१ रिक्षा चालक आणि कलम १७९ अन्वये लागू केलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाºया ३४८ अशा ५४४ वाहनचालकांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.* ठाणे वाहतूक पोलिसांच्या १८ विभागांसह २२ पथकांनी केलेल्या या कारवाईत निर्बंधांचे उल्लंघन करणारे सर्वाधिक वाहनचालक मुंब्रा (११४) परिसरात आढळले आहेत. त्या खालोखाल भिवंडी (४९), नौपाडा (४९), नारपोली (४९), वागळे इस्टेट (३९), उल्हासनगर (३०), डोंबिवली (२८), राबोडी (२७), अंबरनाथ (२६), कोनगाव (२५), कल्याण (१३) आणि कोळशेवाडी (१३) या ठिकाणी कारवाई करण्यात आली.‘कोरोनाचे वाढते संक्र मण रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची कारवाई टाळण्यासाठी सर्वांनी या निर्बंधाचे पालन करावे.’बाळासाहेब पाटील,पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर
कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या ५४४ वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 1:23 AM
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ ही मोहिम सुरू केली आहे. असून त्या अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाºया५४४ वाहन चालकांविरुद्ध ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने मंगळवारी पहिल्याच दिवशी कारवाई केली.
ठळक मुद्देठाणे वाहतूक पोलिसांची धडक मोहीम जादा प्रवाशांची वाहतूक करणाºया रिक्षा चालकांवरही कारवाई