डोंबिवली - कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गँगमनला चौकशीसाठी बोलावल्याने संतप्त सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनने कल्याण रेल्वे स्थानकात रेल रोको केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली. संतापलेल्या सेंट्रल मजदूर युनियनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी गँगमन निर्दोष असल्याचे सांगत या घटनेचा निषेध व्यक्त केला.बुधवारी दुपारी विठ्ठल वाडीहून कल्याणच्या दिशेने रेल्वेने जनाबाई वाणी या प्रवास करत असताना त्यांच्याकडील पर्स रेल्वे रुळावर पडली. कल्याण रेल्वे स्थानकात उतरून त्यांनी काही गँगमन काम करत असल्याचे दिसले याच वेळी गौतम कदम या गँगमनने या महिलेला तिचा खाली पडलेला मोबाईल तिला परत केला, मात्र या महिलेने आपली पाच हजार रुपये रोकड असलेली पर्स ही पडली होती. ती कदम याने चोरल्याचा आरोप केला यावेळी उपस्थित गँगमनने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने थेट कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठत गँगमन गौतम कदम याने पर्स चोरल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर गुरुवारी रेल्वे पोलिसानी कदमला चौकशीकरिता बोलावून घेतले.ही बाब सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांना कळताच संध्याकाळी 6च्या सुमारास त्यांनी थेट कल्याण रेल्वे स्थानक गाठत या घटनेचा निषेध करत गँगमन कदम याने सापडलेला मोबाईल परत केला. पर्स त्याने चोरली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करत कल्याण रेल्वे स्थानक प्लँटफॉर्म क्रमांक पाच वर रेल रोको केला. दरम्यान पोलिसांनी कदम या सोडून दिले असले तरी सदर महिला मात्र आपल्या तक्रारीवर ठाम आहे. कदम यांनी चौकशी सुरू असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक साठे यांनी दिली.
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी केला रेल रोकोचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 9:52 PM