ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये बुधवारी नामवंत अभिनेत्री उदिता गोस्वामी यांची ठाणे पोलिसांनी चौकशी केली. तिच्या जबाबात अॅड. रिझवान सिद्दीकी यांचे नाव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.केवळ विशिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने मिळू शकणार्या कुणाच्याही मोबाइल नंबर्सचे सीडीआर बेकायदेशीरपणे मिळवून त्याची विक्री करणार्या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने जानेवारी २0१८ मध्ये केला. बुधवारी याच प्रकरणामध्ये अभिनेत्री उदिता गोस्वामी यांना ठाणे पोलिसांची पायरी चढावी लागली. उदिता गोस्वामी यांचा लेखी जबाबाद्वारे ठाणे पोलिसांनी घेतला. त्या पती मोहीत सुरी यांच्या समवेत आल्या होत्या. त्यांचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया जवळपास तासभर चालली. सीडीआर प्रकरणाच्या तपासामध्ये आपण पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे उदिता यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.सीडीआर प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांची पायरी चढाव्या लागणाºया उदिता गोस्वामी या बॉलिवूडशी संबंधित दुसर्या व्यक्ति आहेत. यापूर्वी १२ एप्रिल रोजी पोलिसांनी अभिनेता जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ यांचा जबाब नोंदविला होता. ठाणे पोलिसांनी याप्रकरणामध्ये आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली. त्यामध्ये देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह काही खासगी गुप्तहेरांचाही समावेश आहे.
सीडीआर प्रकरणी अभिनेत्री उदिता गोस्वामीची ठाणे पोलिसांकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 9:08 PM
बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांनी बुधवारी अभिनेत्री उदिता गोस्वामी यांचा जबाब नोंदविला. बॉलिवूडमध्ये या प्रकरणाची जोरदार चर्चा आहे.
ठळक मुद्देपतीसोबत आल्या ठाण्याततासभर नोंदविला जबाबतपासात सहकार्य करण्याचे आश्वासन