ठाणे : बालनाट्य शिबिरात नुसता अभिनय महत्त्वाचा नाही तर उच्चारशास्त्र महत्त्वाचे आहे. गडकरी रंगायतनमध्ये आम्ही तालमीचे स्वातंत्र्य अनुभवले आहे, कोठेही तालमी करीत असय. हे स्वातंत्र्य नव्या पिढीने घ्यावे अशा भावना ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केल्या.
गंधार कला संस्थाच्यावतीने गडकरी रंगायतन येथे आयोजित गंधार युवा महोत्सवात दिगदर्शक विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांना गंधार युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी चकवा आणि आरपार या एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी आ. संजय केळकर, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, प्रा. डॉ. विजय जोशी, प्रा. प्रदीप ढवळ, जयंत पवार, राजू आठवले, प्रकाश निमकर, राजेश उके, महेश सुभेदार, प्रशांत डिंगणकर, प्रा. मंदार टिल्लू, प्रा. संतोष गावडे, बाळकृष्ण ओडेकर, वैभव पटवर्धन व इतर उपस्थित होते. या सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा. प्रदीप ढवळ यांनी केले. त्यांनी प्रा. मंदार टिल्लू आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. डिजिटल युगात नाट्य, कला टिकवण्याचे काम कठीण आहे पण आजच्या पिढीवर हे संस्कार करण्याचे काम गंधार करीत आहे. गंधार कलावंत शोधण्याचे, कलावंत जपण्याचे काम करीत आहे. त्यांनतर लघुपट, बालनाट्यमध्ये काम केलेल्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. चकवा आणि आरपार या एकांकिकेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या आशुतोष बाविस्कर यांचाही गौरव करण्यात आला. सत्काराला विजू माने, निरंजन कुलकर्णी, अभिजित चव्हाण यांनी उत्तर दिले. जयंत पवार आपल्या मनोगतात म्हणाले की, नाटकासाठी प्रामाणिक काम करणारी एकमेव संस्था म्हणजे गंधार. नाट्यक्षेत्राशी जोडतो तेव्हा आपोआप व्यक्तिमत्त्व विकास होतो त्यासाठी कोणत्याही व्यक्तिमत्त्व विकास शिबिराची गरज नाही. विजय जोशी म्हणाले, कोणतेही पारितोषिक हा मैलाचा दगड असतो तो बाजूला सारून पुढे जा असा सल्ला उपस्थित कलाकारांना दिला. अशोक बागवे म्हणाले, आ. संजय केळकर म्हणाले, ठाणे हे सांस्कृतिक शहर आहे, अनेक कलाकार या शहरात आहे, बाहेरचे कलाकार देखील आता ठाण्यात येत आहेत. सांस्कृतिक वैभव गंधारच्या चळवळीतून वाढत जाणार आहे. पुरस्कार वितरणाच्या आधी चकवा आणि शेवटी आरपार ही एकांकिका सादर झाली. कार्यक्रमाचे निवेदन आकाश राऊत यांनी केले.