ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने नवी मुंबईतील एका खासगी कंपनीतून कोविड रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर्ससह काही वैद्यकीय उपकरणांच्या निविदा मागविल्या होत्या. या दीड कोटींच्या निविदा मंजुरीसाठी निविदेच्या दहा टक्के म्हणजे १५ लाखांची मागणी केली. त्यातील पाच लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना ठामपाचा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर याला ठाणे एसीबीने अटक केली होती.
...............
कोणी लाचेसाठी अडवणूक करीत असेल तर न डगमगता सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींविरुद्ध नागरिकांनी तक्रार करावी. तक्रार केल्यानंतर आपले काम होणार नाही, अशी एक अनाठायी भीती असते. परंतु, ते काम कायदेशीर असेल तर ते होण्यासाठी एसीबीकडूनही पाठपुरावा केला जातो. त्यामुळे कोणी लाच देणे-घेणे करू नये. तक्रार आली तर एसीबीकडून शहानिशा करून कारवाई केली जाते.
डॉ. पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे
...........................
वर्ष लाच प्रकरणे
२०१६- १२०
२०१७- १०६
२०१८- १०८
२०१९- १०२
२०२०- ४५
२०२१ (२९ जुलैपर्यंत)- ४६