ठाणे : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळा व वसतिगृह मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. मात्र यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग व एकस्तर वेतन आदी प्रलंबित मागण्यासाठी शुक्रवारी शिक्षकांनी जव्हार येथील प्रकल्प अधिकारी व येथील अपर आयुकत कार्यालयाच्या गलथानपणा विरोधात प्रशासनास चांगलेच धारेवर धरून प्रकल्प अधिकाऱ्यांस घेराव घातला आदिवासी विकास विभागाच्या येथील अपर आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार या अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळा व वसतिगृह आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रलंबित मागण्यांसाठी धारेवर धरले. येथील अपर आयुक्त कार्यालयाच्या गलथान व निष्काळजीपणासह प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या मनमानीमुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगासह एकस्तर वेतनास वंचित राहावे लागत असल्याचा आरोप शिक्षकांकडून करण्यात आला आहे . संतापलेल्या या कर्मचाऱ्यांनी एकात्मिक आदिवासी विकासचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी खेडकर व लिपीक इंगळे यांना जव्हार येथे घेराव घालून त्यांच्या निष्काळजी व हलगर्जीपणाची जाणीव करून देत मागण्यांचे निवेदन सुपुर्द केले. यामध्ये आश्रमशाळा व वसतिगृहातील रिक्त पदे भरावीत, ७ वा वेतन आयोगानुसार वेतन निश्चित करणे, अध्यादेश जारी होऊनही एकस्तर वेतन लागू करण्यास विलंब झाला. ते त्वरीत लागू करावे, कर्मचाऱ्यांचे स्थायित्वाचे आदेश देण्यात यावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लाभ देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन शिक्षकांनी देऊन अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
सातव्या वेतन आयोगसह एकस्तरसाठी आश्रमशाळांच्या शिक्षकांकडून अपर आयुक्त धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 7:39 PM
आदिवासी विकास विभागाच्या येथील अपर आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रणातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार या अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळा व वसतिगृह आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रलंबित मागण्यांसाठी धारेवर धरले.
ठळक मुद्देगलथानपणा विरोधात प्रशासनास चांगलेच धारेवरसातव्या वेतन आयोग व एकस्तर वेतन आदी प्रलंबितआश्रमशाळा व वसतिगृहातील रिक्त पदे भरावीत