शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

ठाण्यातील नागरिकांकडून दुधाचा अतिरिक्त साठा, कोरोना चाचणीस दूधविक्रेत्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 12:38 AM

Thane : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या आठवड्यातील हा पहिला वीकेंड लॉकडाऊन होता. अत्यावश्यक सेवा वगळता या दोन्ही दिवशी कडक निर्बंध लागू केले आहेत.

ठाणे : वीकेंड लॉकडाऊनच्या भीतीने ठाणेकरांनी शुक्रवारच्या सायंकाळीच दुधाचा अतिरिक्त साठा करून ठेवला. शनिवार-रविवार दूध येणार नसल्याची भीती ठाणेकरांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांच्या दुधाची खरेदी केल्याचे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेने सांगितले.लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून या आठवड्यातील हा पहिला वीकेंड लॉकडाऊन होता. अत्यावश्यक सेवा वगळता या दोन्ही दिवशी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या दोन्ही दिवशी दूधदेखील मिळणार नाही, ही भीती ठाणेकरांना होती. म्हणून त्यांनी आपापल्या रोजच्या दूध विक्रेत्यांना याबद्दल विचारणा केली. काही जणांनी त्यांना शनिवार-रविवार या दोन्ही दिवसांचे दूध आणून द्यायला सांगितले, तर काहींनी दुकानांत, दूध डेअरी येथे जाऊन ते विकत घेतले.ठाणे शहरात दररोज जवळपास साडेचार ते पाच लाख लिटर दूध येते. परंतु, शुक्रवारी सायंकाळी जास्त दुधाची खरेदी झाली असल्याचे संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चाचणी बंधनकारक!सोसायट्यांनी दूध विक्रेत्यांना कोरोना चाचणी करण्याचे बंधनकारक केले आहे. सोसायटींनी चाचणी करण्याची सक्ती केल्यास त्यांना दूध टाकणार नाही, अशी भूमिका संस्थेने घेतल्याचे चोडणेकर यांनी सांगितले.  याबाबत ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी म्हणाले की, प्रत्येकाने कोरोनाचाचणी करणे बंधनकारक आहे. कारण हा प्रत्येकाच्या जिवाचा प्रश्न आहे. व्यवसायही करायचा आहे आणि चाचणी नको, असे होत नाही.  

टॅग्स :thaneठाणे