शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
6
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
7
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
8
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
9
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
10
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
11
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
12
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
13
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
14
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
15
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
16
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
17
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
18
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
19
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
20
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा

आदित्यचे ‘टॅब’स्वप्न भाजपा करणार साकार

By admin | Published: March 06, 2016 1:53 AM

मागील वर्षभर ठाणे महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हाती टॅब देण्याचा मुद्दा महापालिका वर्तुळात चांगलाच गाजत आहे

ठाणे : मागील वर्षभर ठाणे महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हाती टॅब देण्याचा मुद्दा महापालिका वर्तुळात चांगलाच गाजत आहे. त्यात आता टॅबसाठी केलेली आर्थिक तरतूद अपुरी पडत असल्याने ती ३ कोटींची करण्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु, शिवसेनेने भाजपाला स्थायी समितीच्या चाव्या देण्याचे कमिटमेंट दिल्याने टॅबच्या वाढीव तरतुदीचा चेंडू थेट भाजपाच्या मैदानात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपा आता वर्षभर रखडलेला टॅबचा मुद्दा मार्गी लावून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे स्वप्न साकारण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या हाती ते मिळावेत म्हणून स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी यासाठी एक कोटींची तरतूद मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात केली होती. दरम्यान, मागील महिन्यात झालेल्या महासभेत माजी महापौर अशोक वैती आणि स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी याच आर्थिक वर्षात विद्यार्थ्यांच्या हाती ते पडावेत म्हणून महापौरांकडे मागणी केली होती. विशेष म्हणजे महापौरांनीच टॅबचा प्रस्ताव पुढील आर्थिक वर्षात घेण्याचे निश्चित केल्याचा आरोपही वैती यांनी केला होता. परंतु, नंतर महापौरांनीदेखील पुढील महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जाईल, असे स्पष्ट केले होते.