शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
2
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
3
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण: ज्युनियर डॉक्टरांचं आंदोलन; ममता सरकारवर गंभीर आरोप
4
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न
5
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
6
राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज
7
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
8
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
10
सारंगीवादक पंडित राम नारायण यांचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
11
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
12
मतदान केंद्रांवर मोबाइलबंदीच्या विरोधात हायकोर्टात याचिका; बंदी घालू शकत नसल्याचा केला दावा
13
चंद्रभागेच्या तीरावर महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम
14
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
15
धक्कादायक! जप्त पैशांची अफरातफर; दोन भरारी पथकप्रमुखांना केले निलंबित
16
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
17
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
18
मृणाल दुसानिसचं छोट्या पडद्यावर कमबॅक, लवकरच 'या' मालिकेत दिसणार; प्रोमो रिलीज
19
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
20
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?

इगतपुरीतील आदिवासी शेतकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा; न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2023 7:31 PM

सलग पायी निघालेला मोर्चा कसारा घाटा च्या पुढे आला असून पायी निघालेला शेतकऱ्यांचा हा लॉन्ग मार्च थेट मुबंईत जाणार

- शाम धुमाळ

कसारा :इगतपुरी तालुक्यातील भावली ,चिंचले,आवळखेड सह काही आदिवासी गावातील शेतजमिनी काही दलालांनी विक्री करून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमीन बेकायदेशीर बळकावल्या  गेल्या 2011 पासून इगतपुरी तालुक्यातील पीडित आदिवासी शेतकरी बांधव  भूमाफियांवर व दलाला वर कारवाई व्हावी यासाठी शासन दरबारीं भांडत आहेत परंतु त्या पीडित शेतकर्यांना न्याय मिळत नसल्याने आज इगतपुरी तालुक्यातील शेकडो आदिवासी शेतकरी आपल्याला न्याय मिळावा फसवणूक करून धंन धांडगे व दलालांनी लाटलेल्या जमिनी परत मिळाव्यात व फसवणूक करणाऱ्या समज कंटकां वर कारवाई व्हावी यासाठी. आज या आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा मुंबई च्या दिशेने निघाला असून हा मोर्चा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पोहोचले आहे.

बेकायदेशीर बळकावलेल्या आदिवासींच्या शेत जमीन परत द्या व भूमाफियांवर गुन्हे दाखल करा जी घरे दादागिरी करून तोडली त्यांची भरपाई द्यावी यासह विविध मागणीसाठी हा आदिवासी शेतकऱ्यांचा  मोर्चा पायी मुंबई च्या दिशेने निघाले आहे .या मोर्चात शेकडो आदिवासी शेतकरी सहभागी झाले असून महिला व वृद्धांचा सहभाग जास्त प्रमाणात आहे.

 सलग पायी निघालेला मोर्चा कसारा घाटा च्या पुढे आला असून पायी निघालेला शेतकऱ्यांचा हा लॉन्ग मार्च थेट मुबंईत जाणार असून शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शासनाचा निषेध नोंदवत हा मोर्चा कसारा च्या पुढे निघाला आहे.मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा स्थिरवणार असून मंत्र्यांना निवेदन देऊन आझाद मैदानात काही शेतकरी उपोषण करणार आहेत तर काही शेतकरी आत्मदहन करणार असल्याचे मोर्चे करां नी स्पष्ठ केले.

2011 पासून आम्ही इगतपुरी तहसीलदार,जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कडे न्याय मागत आहोत आमच्या कडील सर्व दस्तावेज आम्ही प्रशासनास दिले,आमचे जबाब नोंदवले तरी देखील प्रशासनाने अध्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही उलट ज्यांनी आमच्या जागा लाटल्या त्यांनी आम्हाला गुंडाकरवी मारहान केली म्हणून आम्ही सर्व आदिवासी  मंत्रालया वर मोर्चा घेऊन निघालो असून आम्ही आत्मदाहन करणार आहोत.- बेबीताई हिलम, पीडित शेतकरी