शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
2
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
3
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
4
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
5
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
6
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
7
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
8
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
9
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
10
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
11
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
12
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
13
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
14
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
15
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
16
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
17
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
18
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
19
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
20
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 

काशीमिरामध्ये आदिवासी वसतिगृह

By admin | Published: April 10, 2017 5:37 AM

मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील नियोजित आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी

 भार्इंदर : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील नियोजित आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यावर ३० कोटी देण्यास आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत तत्वत: मंजुरी दिली. कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले. यामुळे मे महिन्यात वसतिगृहाच्या कामाला सुरूवात होण्याची शक्यता सरनाईक यांनी व्यक्त केली. बैठकीला आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनीषा वर्मा, आयुक्त राजीव जाधव, मीरा-भाईंदर पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. मीरा-भार्इंदर पालिका हद्दीला लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह त्याच्या सीमेवर अनेक आदिवासी पाडे आहेत. त्यातील झोपडीवजा घरात आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागतो. त्यांना पक्क्या जागेत अभ्यास करता यावा यासाठी सरनाईक २०१३ पासून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. यानुसार काशीमिरा परिसरातील मुन्शी कंम्पाउंडच्या मीरागावच्या सर्र्वे क्र. १९३ (जुना) ८ (नवीन) मधील ६ हजार ६०० चौरसमीटर जागा महसूल विभागाची आहे. त्यातील २ हजार ३७१ चौरसमीटर जागेवर अतिक्रमण झाले असून उर्वरित जागेवर शाळा बांधण्यासाठी पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २०११ पासून पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने ही जागा देण्यापोटी पालिकेला १६ कोटी ८३ लाख जमा करण्यास सांगितले होते. या व्यवहारादरम्यान आदिवासी विभागाने ती जागा वसतिगृहाकरिता मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने २०१३ मध्ये विभागाला ४ हजार २२९ चौरसमीटर जागा मोफत दिली. जागा ताब्यात आल्यानंतर राज्य सरकारने त्या ठिकाणी आदिवासी मुलामुलींसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेत ते पालिकेने बांधण्याचे ठरविले. बांधकामासाठी येणारा खर्च राज्य सरकारच्या आदिवासी विभागाने देण्याचे निश्चित झाल्यानंतर तसे पत्र पालिकेला पाठविले. त्यानुसार ११ डिसेंबर २०१३ च्या महासभेत वसतिगृह ठरावाला मान्यता दिली. (प्रतिनिधी)१६४ खोल्या बांधण्यात येणारपालिकेने २० फेब्रुवारी २०१४ मध्ये २० कोटी ६० लाख ८७ हजार ७७८ खर्चाच्या बांधकामाचा प्रस्ताव आदिवासी विभागाकडे मान्यतेसाठी पाठविला. त्याला तत्कालिन आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी १९ आॅगस्ट २०१४ च्या बैठकीत मान्यता दिली. दरम्यान महागाईमुळे वसतिगृहाचा खर्च वाढल्याने तो ३० कोटीवर गेला. नियोजित वसतिगृह ४ हजार २२९.२० चौरसमीटर जागेवर बांधण्यात येणार असले तरी मंजूर १.५ चटई क्षेत्राप्रमाणे एकूण ६,०९३.७४ चौरसमीटर क्षेत्रावर ७ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. त्यात प्रत्येकी दोन मुलांची क्षमता असलेल्या १६१ चौरस फुटाच्या १६४ खोल्या बांधण्यात येणार आहेत. त्याचे भूमिपूजन २८ आॅगस्ट २०१४ मध्ये झाले.