शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

...तर मंत्रालयात आत्मदहन! बिऱ्हाड मोर्चाचा इशारा; दोन तास रोखून धरला महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 7:19 AM

आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाने मुंबई-नाशिक महामार्ग रोखून धरला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, कसारा: राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचा मुंबईत मंत्रालयाकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा गुरुवारी मुंबईच्या वेशीवर दाखल झाला. हा मोर्चा कसारा घाटात आला असताना अचानक मोर्चेकऱ्यांनी मुंबई - नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गिका तब्बल दोन तासांहून अधिक काळ रोखून धरल्या. त्यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.  सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही मंत्रालयात आत्मदहन करू, असा इशारा यावेळी मोर्चाच्या नेतृत्व करणाऱ्या रुपाली कंडोळे यांनी सरकारला दिला.

नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून बिऱ्हाड मोर्चाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली. शाळा व  वसतिगृहातील रोजंदारी वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा आहे. कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला सिटू संघटनेने पाठिंबा दिला आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

रस्ता रोकोनंतर शहापूर उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी अधिकारी संदीप गिते यांनी मोर्चेकऱ्यांना रास्ता रोको मागे घेण्यास सांगितले. मात्र, मोर्चेकरी आंदोलनावर ठाम राहिले. हजारो मोर्चेकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठाणे ग्रामीण पोलिस, महामार्ग पोलिस घोटी, शहापूर केंद्रचे अधिकारी, कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय