शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आता कोकणासह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 1:00 AM

विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे

ठाणे : विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील १५६ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली काढत असताना केवळ ७७ शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यातील खाजगी शाळांमध्ये झाले. परंतु, उर्वरित ७९ शिक्षकांना विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द केले आहेत. त्यांचे समायोजन आता कोकणातील जिल्ह्यांत अन्यथा राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागी केले जाणार आहे.अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तीन दिवसांपूर्वी कोपरी येथील मंगला हायस्कूलमध्ये कॅम्प घेण्यात आला. यामध्ये १५ शिक्षकांचे पाचवी ते सहावीच्य विद्यार्थ्यांसाठी समायोजन झाले. तर सातवी ते आठवीच्या वर्गासाठी ३१ शिक्षक आणि नववी ते दहावीच्या वर्गासाठी ३१ शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन झाले. या सुमारे ७७ शिक्षकांचे जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. यानंतर उरलेल्या ७९ शिक्षकांची रवानगी आता कोकण विभागीय आयुक्तालयाकडे केली आहे. त्यांचे समायोजन ठाणे जिल्ह्याव्यतिरिक्त कोकण विभागीतील अन्य जिल्ह्यात होईल, संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Teacherशिक्षकthaneठाणेStudentविद्यार्थीEducationशिक्षणkonkanकोकण