मीरा रोड : विनानिविदा दिलेले लाखो रुपयांचे कंत्राट, हॉलचालकांना पाठीशी घालण्यासह अनेक मनमानी व गैरप्रकारांच्या फैरी शिवसेना खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्तांसह प्रशासनावर झाडल्या. परंतु, या फैऱ्यांवर प्रशासन मात्र ठोस उत्तरच देऊ शकले नाही.
बुधवारी विचारे व सरनाईकांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्यासह पालिका अधिकाºयांची झाडाझडती घेतली होती. या वेळी फेरीवाले हटवण्यासाठी विनानिविदा एस.डी. सर्व्हिसला महिना तब्बल २० लाखप्रमाणे आयुक्त ांसह प्रशासनाने काम दिले. मार्च व एप्रिलचे ३५ लाख रुपये दिले असून मे ते जुलैचे ५० लाख रुपये पालिका देणार आहे. शहरातील फेरीवाले कायम असताना नागरिकांचे लाखो रुपये नियमबाह्य काम करून कुणाच्या घशात घातले जात आहेत, असा सवाल केला. पालिकेने चक्क अत्यावश्यक बाबींसाठी असणाºया कलमाचा संदर्भ विनानिविदा काम देताना लावल्याचे अधिकाºयांनी सांगताच विचारे-सरनाईकांनी चांगलेच धारेवर धरले.नागरिकांच्या सोयीसाठी बनवलेले मीनाताई ठाकरे हॉल व प्रमोद महाजन हॉलही कंत्राटदारांच्या घशात घालून मनमानी लूट चालवली असताना आयुक्त व प्रशासनाने कंत्राटदारास न्यायालयात जाऊ देण्याची संधी दिल्याचा संताप व्यक्त केला. त्यावर आयुक्तांनी न्यायालयात सुनावणी असून चांगले वकील पाठवून स्थगिती हटवू व दोन्ही हॉल पालिका चालवेल, असे आश्वासन दिले.बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या कामाची निविदा स्थायी समितीने मंजूर केली नाही, तर ४५ दिवसांत प्रशासनाने मंजूर करून कार्यादेश देणे आवश्यक असताना प्रशासनाने ते दबावाखाली केले नव्हते. आता ते काम मार्गी लावा, असे सांगितल्यावर आयुक्तांनी ते तपासून कार्यादेश देतो, असे आश्वस्त केले. चेणे येथील रस्त्यासाठी सरकारी निधीतून पाच कोटी मंजूर असून त्याचे कामही पालिका सुरू करेल, असे आयुक्त म्हणाले.
फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाच्या आड पालिकेच्या जागी बांधलेल्या मार्केटमध्ये बाहेरचे फेरीवाले आणून बसवले असून शहरातील फेरीवाल्यांना जागा दिली जात नसल्याचे सांगतानाच या कंत्राटाच्या आड भाजपचे मधुसूदन पुरोहित ५० ते ६० लाखांचा मलिदा लाटत असल्याचा गौप्यस्फोट सरनाईकांनी केला. मार्केट पालिकेने ताब्यात घेऊन चालवावे व शहरातील फेरीवाल्यांचे त्यात पुनर्वसन करावे, असे ते म्हणाले....तर तुम्हाला सोडणार नाहीउत्तन येथे कोंत्या व डिसोझा कुटुंबांची पूर्वीपासूनच्या दोन घरांमधील भिंत मागे झालेल्या बेकायदा बांधकामाच्या रस्त्यासाठी बळजबरीने तोडल्याचा संताप या वेळी व्यक्त झाला. रखडलेल्या बीएसयूपी योजनेचे काम लवकर सुरू करण्याचे सांगतानाच त्यात कोणी स्वत:चे हितसंबंध चालवत असेल, तर ते बंद करा, अन्यथा बेघर झालेल्या लोकांसाठी तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा दिला.