ठाणे: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यंदाच्या खरीप हंगामाच्या कामकाजाचा आढावा सोमवारी घेऊन ६५ हजार ९०९ हेक्टरवर भात या प्रमुख पिकासह अन्य खरीप पीक लागवडीचे नियोजन केले.खरीप लागवडीच्या नियोजनासाठी दरवर्षी थाटात येथील नियोजनभवनमध्ये खरीप लागवडीचे नियोजन केले जाते. मात्र यंदा आचारसंहितेचा फटका त्यासही बसला आहे. पालकमंत्र्यांऐवजी येथील समिती सभागृहात कृषी विभागाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यावेळी आगामी खरीप हंगामाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले. या हंगामात हेक्टरी एक लाख ५७ हजार ९४९ मेट्रीक टन पिक उत्पादनाचा लक्षांक ठरविण्यात आला आहे. यावेळी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक जे.एन.भारती, कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे, कल्याणचे उपविभागीय कृषी अधिकारी जे.एस. बोडके, महाबीजचे पुणे विभागीय व्यव्स्थापक अरविंद सोनोने, उप विभागीय व्यव्स्थापक एस. एम. तेलंगेपाटील आदी कृषीचे अधिकारी वर्ग मोठ्यासंख्येने उपस्थित होते.यावेळी माने यांनी २०ृ१८ या मागील वर्षाच्या खरीप हंगामाचा आढावा व २०१९ या वर्षाचे नियोजनाचे साधरीकरण या बैठकीत स्पष्ट केले. गेल्या वर्षी ५८ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली असता त्याव्दारे एक लाख ४४ हजार २२९ मेट्रिक टन उत्पादन घेता आले आहे. यात भात पिकाची उत्पादकता दोन हजार ५५३ किलो प्रति हेक्टर इतकी होती. या शिवाय नागलीचे पिक हे ८०५ किलो प्रति हेक्टर इतके झाले आहे. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ९०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे केली जाणार आहे. यापैकी भात पिकासाठी ५९ हजार २७९ हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. तर दोन हजार ५७८ किलो प्रति हेक्टर उत्पादकतेचा लक्षांक निश्चित केला आहे.या भात पिकाच्या लागवडीसाठी जिल्ह्याला दहा हजार ६७० क्विंटल बियाण्याचे नियोजन केले आहे. तर १४ हजार २८० मेट्रीक टन खतांचे आवंटन प्राप्त झाले आहे. याशिवाय दोन हजार २६० हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाचे नियोजन केले आहे. तर एक हजार २१० हेक्टरवर इतर तृणधान्य घेतले जाईल. या शिवाय ८८० हेक्टरवर उडीद, १९० हेक्टरवर मुग, एक हजार ३२० हेक्टरवर तूर, २३७ हेक्टरवर गळीत धान्य पिके आणि ५३३ हेक्टरवर इतर कडधान्य असे पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात ५८ हजार ८६९ हेक्टर शेत जमिनीवर खरीप पिकांची लागवड झाली होती. यंदा भात पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारीय बियाण्यांचा वापर, लागवड पद्धतीत बदल तसेच कडधान्य उत्पादन वाढीसाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
ठाणे जिल्ह्यात यंदा ६६ हजार हेक्टरवर भातासह खरीप पिकांच्या लागवडीसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 7:30 PM
खरीप लागवडीच्या नियोजनासाठी दरवर्षी थाटात येथील नियोजनभवनमध्ये खरीप लागवडीचे नियोजन केले जाते. मात्र यंदा आचारसंहितेचा फटका त्यासही बसला आहे. पालकमंत्र्यांऐवजी येथील समिती सभागृहात कृषी विभागाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यावेळी आगामी खरीप हंगामाच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले. या हंगामात हेक्टरी एक लाख ५७ हजार ९४९ मेट्रीक टन पिक उत्पादनाचा लक्षांक ठरविण्यात आला आहे
ठळक मुद्देया हंगामात हेक्टरी एक लाख ५७ हजार ९४९ मेट्रीक टन पिक उत्पादनाचा लक्षांक ठरविण्यात आला गेल्या वर्षी एक लाख ४४ हजार २२९ मेट्रिक टन उत्पादन घेता आले भात पिकासाठी ५९ हजार २७९ हेक्टर पेरणीचे नियोजन करण्यात आले