शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मीरा भाईंदर महापालिका शाळांमधील डिजिटल वर्गातील शिक्षकांवर राहणार प्रशासनाची नजर 

By धीरज परब | Published: October 23, 2022 6:47 PM

मीरा भाईंदर महापालिका शाळांमधील डिजिटल वर्गातील शिक्षकांवर राहणार प्रशासनाची नजर असणार आहे.  

मीरारोड : मीरा भाईंदर महापालिका दिवाळीच्या सुट्टी नंतर शाळांमध्ये ५० डिजिटल वर्ग सुरु करणार असून त्यात शिकवणाऱ्या शिक्षकांच्या कामावर प्रशासनाची नजर असणार आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने दिलेल्या माहिती नुसार, पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. शैक्षणिक दर्जा आणखी उंचावण्यासाठी महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले व सबंधित अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने दिवाळी सुट्टी नंतर ५० डिजिटल वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या डिजिटल वर्गांत विद्यार्थ्यांना तंत्रज्ञाचा वापर करत नवनवीन माहिती ही चित्रफित, छायाचित्र स्वरूपात शिकवण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

सदर डिजिटल वर्ग हे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती व सेमी इंग्रजी या भाषेत सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न हे या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येणार आहेत. या डिजिटल वर्गांमुळे महानगरपालिका शाळां मधील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर होणार आहे. या डिजिटल वर्गांच्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी थेट संपर्क साधता येणार आहे. 

शिक्षकांना या डिजिटल वर्गांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे . यंत्रणेचा वापर कसा करावा, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवावे याची माहिती प्रशिक्षणात शिक्षकांना मिळाली आहे. परंतु शिक्षकांनी या डिजिटल वर्गांच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना काय शिकवले, शिक्षकाने किती वेळ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी दिला याचा डाटा ऑनलाईन स्वरूपात जतन करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या गुणवत्ता व जबाबदारीवर प्रशासनाचे बारीक लक्ष असणार आहे. कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांवर या मुळे कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकTeacherशिक्षक