शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
2
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
3
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
4
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
5
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
6
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
7
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
8
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
9
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
10
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
11
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
12
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
13
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
14
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
15
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग
16
महाराष्ट्रात ब्ल्यू इकोनॉमीला चालना, रोजगाराच्या लाखो संधी...: PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
17
'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका
18
“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
19
"ठाकरेंच्या कुठल्याच व्यक्तीला काही बोलणार नाही, बाळासाहेबांना वचन दिलेले"; नारायण राणे उद्धव ठाकरेंना प्रत्यूत्तर देणार?
20
AUS vs PAK : ऑस्ट्रेलियात फजिती! फक्त ७ ओव्हर्सची मॅच; त्यातही पाकनं गमावल्या ९ विकेट्स

आरक्षणानुसार उमेदवार नसल्यास सरपंचाऐवजी प्रशासकीय राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 1:06 AM

सरपंचपदाचे आरक्षण : ‘पेसा’ गावात उमेदवाराची शक्यता कमी

ठाणे : जिल्ह्यातील तब्बल ४१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. त्यातून नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या १५१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड जिल्ह्यात ८ व १० फेब्रुवारी या दोन दिवसांत होणार आहे. आरक्षणानुसार होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडीसाठी संबंधित उमेदवार न मिळाल्यास सरपंचपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीवर सरकार प्रशासकाची निवड करून कामकाज पाहणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.जिल्ह्यातील मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी या निवडणुका झाल्या आहेत. १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी मतदान झाले आहे. यासाठी दोन हजार ४१३ उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. आठ ग्रामपंचायतींच्या ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड आधीच झाली होती. उर्वरित पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर  बहिष्कार टाकल्यामुळे तेथे निवडणुका झाल्या नाही. या गावांमध्ये पेचजिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी ४१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढले आहे. त्यापैकी आता १५१ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड आहे. निवडून आलेल्या एक हजार ४१२ सदस्यांपैकी ७८६ महिला आहेत; पण आरक्षणानुसार सरपंच असल्यामुळे बहुतांश ठिकाणी पेसा असलेल्या गावांमध्ये आरक्षणानुसार उमेदवार मिळण्याची शक्यता कमी आहे.पुढे काय करणार या ग्रामपंचायतींच्या निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सरपंचपदाच्या आरक्षणास अनुसरून उमेदवार नसल्यास ग्रामपंचायत अस्तित्वात येणार नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीपर्यंत ग्रामपंचायतींवर प्रशासक राज अस्तित्वात राहणार असल्याचे आतापर्यंतच्या अनुभवावरून राजकीय वतुर्ळात ऐकायला मिळत आहे.बहुमत नसताना लॉटरी जिल्ह्यात सर्वाधिक ७८६ महिला निवडून आलेल्या आहेत, तर ६२५ पुरुष विजयी झाले आहेत. पण, सरपंचपदाच्या आरक्षणानुसार जास्त सदस्य संख्या असलेल्या विरोधी गटात उमेदवार नसल्यास प्रतिस्पर्धी गटातील मागासवर्गीय उमेदवाराला सरपंचपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. बहुतांश सदस्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.